देश हितासाठी कॉग्रेस पक्ष हाच सक्षम पर्याय - अशोकराव गोडसे
वडूज प्रतिनिधी / शरद कदम
समाजभूषण हणमंतराव साळुंखे पतसंस्था कलेढोण व खटाव तालुका राष्ट्रीय कॉग्रेस महिला आघाडीच्या वतीने कॉग्रेसच्या नूतन पदाधिकारी यांचा सत्कार हणमंतराव साळुंखे विद्यालयात आयोजीत केला होता. यावेळी सातारा जिल्हा नियोजन समिती सदस्यपदी अशोकराव गोडसे, जिल्हा क्राँग्रेस चिटणीसपदी भरत जाधव, खटाव तालुका अध्यक्षपदी डॉ. विवेक देशमुख, खटाव- माण अध्यक्षपदी डॉ. महेश गुरव, कॉग्रेस असंघटीत महिला कामगार आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी शारदा भस्मे तर कोरोना काळात पत्रकारीता क्षेत्रात उत्कृष्ट पत्रकारीता केल्याबद्दल शरद कदम यांचा सत्कार करण्यात आला. समाज भुषण हणमंतराव साळुंखे पतसंस्थेचे चेअरमन संजीव साळुंखे, राष्ट्रीय कॉग्रेसच्या तालुकाध्यक्षा सुजाता महाजन, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र कणसे, गलाई व्यवसायिक मजनुशेठ मुलाणी, गुलमहम्मद शिकलगार, निर्मला साळुंखे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
सत्काराला उत्तर देताना श्री गोडसे म्हणाले, स्वातंत्र लढयात कॉग्रेस पक्षातील अनेक नेत्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. सर्वसामान्य माणसाला जर चांगले जीवन जगायचे असेल, देशाचे हीत जोपासयाचे असेल तर केवळ कॉग्रेस पक्षच हाच सक्षम पर्याय आहे. देशाची प्रगती केवळ कॉग्रेस पक्षच करू शकतो. देशाची प्रगती कॉग्रेसच्या विचारधारेवर अवलंबून आहे. मी गेली ४० वर्ष पक्षाची एक निष्ठेने जी सेवा केली त्याचे आज मला नियोजन समितीच्या माध्यमातून फळ मिळाले आहे.
यावेळी संजीव साळुंखे म्हणाले, कॉग्रेस पक्ष हा स्वातंत्र लढयापासुन आजपर्यंत देशातील गोरगरीब जनतेसाठी लढत आलेला आहे. जीवनातील भेडसवणारे प्रश्न तसच घटनेनुसार प्रत्येकाला न्याय देण्याचे काम काँग्रेस पक्ष करीत आहे. सौ. सुजाता महाजन म्हणाल्या देशहीतासाठी महिलांनी लोकशाहीच्या प्रेरणेने सहभागी झाले पाहिजे तरच खऱ्या अर्थाने देश सुजलाम सुफलाम होईल. काँग्रेस पक्ष हा विचारांवर चालणारा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे. देश हितासाठी जातीवादी पक्षाला हद्दपार करून आपण कॉंग्रेस पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहीले पाहीजे.
कार्यक्रमास ग्रामस्थ व विद्यालयातील सर्व शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वैशाली खंदारे यांनी केले. प्रास्ताविक श्रीमंत सानप यांनी तर आभार प्रमोद लावंड यांनी मानले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा