दहिवडी येथे गुणवंत विध्यार्थी गुणगौरव व कोविड योध्दा सन्मान सोहळा संपन्न
दहिवडी ता.तुळजापूर येथील मायभूमी फाऊंडेशन च्या वतीने गुणवंत विध्यार्थी गुणगौरव व कोविड योध्दांचा गुणगौरव सोहळा (दि.१३)रोजी येथील जि.प.
शाळेत पार पडला.
सदरील कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून तामलवाडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित,
व्याख्याते डॉ.आनंद मुळे सर, कोविड योध्दे डॉ. अजित राठोड,डॉ. डॉ.हिम्मत गाटे,डॉ.राजेश पाटील,डॉ.प्रमोद अंबुरे,
मुख्याध्यपक सोनवणे सर,ग्रामसेवक रमेश यलम,लँब अशिस्टंट बिभीषण
गाटे,डॉ. संतोष विभुते,मेजर धनाजी गाटे,परिचारिका श्रीमती भाग्यश्री अशोक भालशंकर,आशा कार्यकर्त्या
सौ.संगिता भालशंकर,अंगणवाडी सेविका सौ.शोभा काळे,सौ.अनुसया
काळे,सौ.शीलाबाई गाटे,सौ.गीता भालशंकर,आदी उपस्थीत होते.
यावेळी पोलीस निरीक्षक सचिन पंडित यानीं मायभूमी फाऊंडेशन हे गुणवंत विध्यार्थ्यी व कोरोना योध्दा यांचे गुनगौरव करुन स्फूर्ती वाढविण्याचे विधायक कार्य करत आहे.त्या बद्दल मायभूमी फाऊंडेशन च्या सर्व पदाधिकारी यांचे प्रथम कौतूक केले.
त्याचबरोबर लहान गावातील गुणवंत विध्यार्थी शोधून त्यानां पुढील संधीचा शोध घेण्याची स्फूर्ती देऊन गावाचे भविष्य उज्वल करण्यासाठीचा हा प्रयत्न नक्की चांगला असून सर्व विध्यार्थीनी स्पर्धेत राहून यश संपादन करावे,असे प्रतिपादन कले.पुढे बोलतानां पंडित म्हणाले की विध्यार्थीनी जिद्द,परिश्रम, ध्येय निश्चित करुन प्रयत्न केल्यास यश मिळते असे अवर्जून सांगितले.
....................................................
चौकटः
उपस्थीत सर्व विध्यार्थ्याना मार्गदर्शन करतानां डॉ. आनंद मुळे यानीं " वर्तमान व भविष्य आणि युवका समोरील आव्हाने " ह्या विषयावर व्याख्यान दिले.मार्गदर्शन करतानां मुळे म्हणाले की सध्याचा तरुण सोसेल मीडियाच्या आधीन गेला आहे.भौतीक,सांस्कृतिक, शैक्षणिक विकास म्हणजे सामाजिक विकास होय.विधायक आणि चांगल्या कामसाठी प्रत्याकाचे मण मोठे असने आवश्यक आहे.चांगले काम करणाऱ्या ना प्रोत्साहन द्या,चांगल्या कामाचे समर्थन करा,संधीचा लाभ घेण्यासाठी आपण पात्र आहोत का हे तपासने तेवढेण महत्वाचे असल्याची जाणीव करुन दिली.
वर्तमान काळात आपण कशी वाटचाल करतो हे प्रत्येकाने पाहावे,मोबाईल मुळे एकमेका मधीन वैचारिक देवान घेवान मंदावली असल्याची खंत मुळे यानीं व्यक्त केली.
....................................................
कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात वैभव गाटे यानीं मायभूमी फाऊंडेशन ची स्थापणा सन.२०२० मध्ये झाल्याची तसेच आजपर्यंत फाऊंडेशन च्या वतीने वृक्षारोपण,कोरोना काळात नागरिकानां मोफत मास्क,सँनिटायझर वाटप,
विध्यार्थ्यी ना शालेय साहित्य वाटप आदी उपक्रम सभासद वर्गणी मधून झाले असल्याचे जाणीव पुर्वक सांगितले.
त्यानंतर डॉ.हिम्मत गाटे यानीं सन्मानित विध्यार्थी ना आपले अनुभव सांगतानां म्हणाले की आवडेल तेच करा,
एमपीएससी, युपीएससी साठी प्रयत्न करा,आपण वयाच्या २१,२२ वर्षी करीयर करु शकतो,परस्थिती तुम्हाला घडवू शकते.याची जाणीव करुन दिली.यावेळी सर्व सन्मानित विध्यार्थी, पालक,नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन किरण गाटे यानीं केले तर उपस्थीतांचे आभार धनाजी गाटे यानीं मानले.
प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा