Breaking

सोमवार, १३ सप्टेंबर, २०२१

यलमरवाडी खूनप्रकरणी एक महिला व एक पुरुषांस अटकदहिवडी, वडूज,औंध पोलीसांची संयुक्त कारवाई



यलमरवाडी खूनप्रकरणी एक महिला व एक पुरुषांस अटक


दहिवडी, वडूज,औंध पोलीसांची संयुक्त कारवाई 

वडूज प्रतिनिधी / शरद कदम

      खटाव तालुक्यातील यलमरवाडी येथे एका महिलेचा खून झाला असून अज्ञाताच्या विरूध्द वडूज पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे. तपासात एक महिला व एक पुरुष यांना आरोपी करण्यात आले आहे.
         याबाबत वडूज पोलीस स्टेशनमधून मिळालेल्या माहिती अशी की मूळ एनकूळ गावची रहिवासी असलेली हिराबाई दगडू जगताप वय ७० वर्ष हि सध्या यलमरवाडी येथे बाळकृष्ण पांडुरंग पोळ यांच्या घराशेजारी राहत होत्या. रविवार दि १२ रोजी संध्याकाळच्या दरम्यान हिराबाई जगताप यांना अज्ञात कारणावरून अज्ञातानी डोक्यात कशाने तरी मारहाण करून गंभीर जखमी करून खुन करण्यात आला. त्यावरून वडूज पोलीस ठाण्यात गुरनं ३५१/२०२१ भादविस कलम ३०२ प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख, औंध पोलीस स्टेशनचे सपोनि प्रशांत बधे, दहिवडी सपोनि संतोष तासगावकर, पोलीस उपनिरिक्षक भंडारे यांनी अवघ्या १२ तासात खुनाचा छडा लावला असुन संशयीत म्हणून एक महिला व एक पुरुष यांना ताब्यात घेऊन अटक केली आहे.     
         सदरची कारवाई पोलीस अधिक्षक अजय बन्सल, अप्पर पोलीस अधिक्षक धीरज पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वडूज पोलीस स्टेशनचे सपोनि मालोजीराव देशमुख, दहिवडी सपोनि संतोष तासगावकर, औंध सपोनि प्रशांत बधे,मपोउनि शितल पालेकर, पो ना नितीन सजगणे, पो.कॉ. रमेश बर्गे, श्री.चंदनशिवे , श्री ओंबासे, चंद्रकांत वाघ, अश्विनी काळभोर, दादासाहेब देवकुळे, दऱ्याबा नरळे, संदीप शेडगे, सागर बदडे, दिपक देवकर, भूषण माने, प्रशांत पाटील, सागर पोळ, कुंडलीक कटरे यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा