Breaking

शनिवार, ४ सप्टेंबर, २०२१

नातेपुते येथील मनसे पदाधिकारी यांच्या निवडी जाहीर.



नातेपुते शहर मध्ये मनसे पदाधिकारी यांच्या निवडी जाहीर.


मराठी हृदय सम्राट सन्माननीय श्री  राज ठाकरे  स्वप्नातील जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र घडविण्या साठी मनसे नेते दिलीप बापू धोत्रे माढा लोकसभा अध्यक्ष आप्पासाहेब कर्चे मनसे तालुकाध्यक्ष सुरेश भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली नातेपुते शहर मध्ये मनसे पदाधिकारी यांच्या निवडी व काही महाराष्ट्र सैनिक यांचा मनसेमध्ये प्रवेश घेण्यात आला. मनसे नातेपुते शहर उपाध्यक्षपदी विशाल तारळकर, मनसे शहर प्रसिद्धी प्रमुख पदी दादासाहेब भांड, मनसे कामगार सेना नातेपुते शहराध्यक्षपदी सागर लोखंडे, व मनसे विद्यार्थी सेना नातेपुते शहर उपाध्यक्षपदी लखन काळे यांची निवड करण्यात आली. तसेच असंख्य महाराष्ट्र सैनिकांनी मनसेमध्ये प्रवेश केला. विक्रम माने, सचिन काळे, सुरज मदने, विकास माने, शिवराम धोत्रे, अक्षय तारळकर, अक्षय ढोबळे, शिवम लांडगे, ओमकार बावकर, किरण  खिलारे, पोपट शिंदे, सोमनाथ कुमठेकर, अक्षय मदने, महेश खुडे, अमोल रीटे यांच्यासह असंख्य महाराष्ट्र सैनिकांनी मनसेमध्ये आज प्रवेश केला. यावेळी उपस्थित मान्यवर पुढील प्रमाणे मनसे माढा लोकसभा अध्यक्ष आप्पासाहेब कर्चे, मनसे तालुका संघटक अजित पवार, मनसे तालुका उपाध्यक्ष बाबा ननवरे, मनसे विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष प्रेम भैया देवकाते पाटील, मनसे शहराध्यक्ष रवी भैया काळे, विद्यार्थी सेना तालुका उपाध्यक्ष अक्षय बावकर, मनसे चित्रपट सेना तालुका अध्यक्ष वैभव कुलथे, विद्यार्थी सेना शहराध्यक्ष निलेश गरगडे, शंभू दादा वाघमोडे, ओंकार पिसे, मनसे युवानेते अक्षय ठोंबरे इत्यादी मनसे पदाधिकारी उपस्थित होते.

माळशिरस प्रतिनिधी वैष्णवी थोरात

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा