*तुळजापूर येथे शिष्यवृत्ती नियोजन कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न*
आज दिनांक 9 सप्टेंबर 21 रोजी केंद्र अपसिंगा अंतर्गत सर्व शाळांची शिष्यवृत्ती नियोजन कार्यशाळा ग्रामीण बीट च्या विस्ताराधिकारी दैवशाला शिंदे मॅडम यांच्या संकल्पनेतून कन्या प्रशाला तुळजापूर याठिकाणी उत्साहात संपन्न झाली.
या कार्यशाळेचे प्रास्तविक आपसिंगा केंद्राचे केंद्रप्रमुख श्री ऋषीकांत भोसले* यांनी केले.
तुळजापूर ग्रामीण बीटच्या विस्ताराधिकारी श्रीमती दैवशाला शिंदे मॅडम,यांनी गतवर्षीच्या निकालाचा आढावा घेऊन यावर्षी कोणत्या पद्धतीने शिष्यवृत्ती चा अभ्यास पूर्ण करायचा, सराव कसा घ्यायचा, सराव चाचणीचे नियोजन त्याचबरोबर शिष्यवृत्तीच्या अभ्यासाचे घटक नियोजन याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी शाळेतल्या प्रत्येक विषय शिक्षकांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आणि नियमित कालावधीत सर्व घटक शिकवून पूर्ण करणे आणि जास्तीत जास्त सराव घेणे याबाबत संकल्प करण्यात आला.
श्रीमती रंजना डोलारे मॅडम (मसला खुर्द),*श्री पाटील सर* (कामठा),श्री गोरे सर (नरेंद्र आर्य विद्यालय अपसिंगा) यांनी शिष्यवृत्ती अध्यापनातील आपले अनुभव कथन केले.
तसेच ,श्री अंबादास मैंदर्गी (ढेकरी) यांनी ऑनलाईन अध्यापनात उपयुक्त असणाऱ्या सॉफ्टवेअरची व विविध ॲप्स ची माहिती उपस्थितांना दिली.
सूत्रसंचालन श्री नितीन ढगे तर आभार प्रदर्शन *श्रीमती रंजना डोलारे,यांनी मानले.
प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा