Breaking

सोमवार, १३ सप्टेंबर, २०२१

मांजरगाव मध्ये कोविड लसिकरण संपन्न*



*मांजरगाव मध्ये कोविड लसिकरण संपन्न* 

*करमाळा तालुका प्रतिनिधी- अतुल वारे पाटील*

   मौजे मांजरगाव मध्ये रविवारी कोविड 19 चे लसिकरण मेगा कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 300 ग्रामस्थांना कोव्हीड लसीकरण  करण्यात आले.
      बरेच दिवसा पासुन लसीकरणाची ग्रामस्थांची मागणी होती .वाढता कोविडचा धोका लक्षात घेता ग्रामस्थांना जास्तीत जास्त लसिकरण करण्याच्या दृष्टीने आरोग्य प्रशासना कडे वेळो वेळी पाठपुरावा करून आज शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती माजी सरपंच महेशकुमार कुलकर्णी यांनी दिली . या शिबिरामध्ये ३००डोस ग्रामस्थांना देण्यात आले. सकाळी १० वाजले पासुन लसिकरणास सुरुवात झाली.  
कोर्टी आरोग्य उपकेंद्राचे सामुदाय आरोग्य अधिकारी  रवि शिंदे ,आरोग्य सेवक  विकास कापसे, सिस्टर शुभांगी माळी यांचे टिम ने काम पाहिले .
यावेळी पोलिस पाटील  राजेंद्र पाटिल , मा.सरपंच महेश कुलकर्णी, उपसरपंच आबासो चव्हाण , जि. प.शाळेचे शिक्षक 
 जाधव, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुभाष गरदडे,
अंगणवाडी सेविका सौ.हुंबे ,
सौ. बिराजदार ,मदतनिस सौ. बागडे , सौ. इंगळे ग्रा.पं. शिपाई मामु खरात, संगणक चालक उमेश धारेकर तसेच गावातील तरुणांनी योग्य नियोजन करून शिबिर पार पाडले. प्रत्येक व्यक्तीने कोविड नियमांचे पालन केले. वीना मास्क कुणीही यावेळी नव्हते .
लसिकरण पुर्ण झाले नंतर आरोग्य कर्मचाऱ्यांचे ग्रामपंचायतच्या वतीने सत्कार करण्यात आला. लसीकरणा बद्दल त्यांचे आभार मानले .           

        अजुन बऱ्याच प्रमाणात ग्रामस्थांचे लसिकरण बाकी असुन पुढील काही दिवसात कॅम्पचे आयोजन करून गावातील ग्रामस्थांचे १०० % लसिकरण पुर्ण करण्याचा प्रयत्न करू असे मत यावेळी विद्यमान सरपंच सौ.गायत्री महेश कुलकर्णी यांनी व्यक्त केले .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा