शेतकर्यांना सरसकट 25 हजार नुसार भरपाई द्या,
राष्ट्रवादीचे दुधगावकर यांची उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे मागणी.
उस्मानाबाद : जिल्ह्यात अतिवृष्टीने बाधीत शेतकर्यांना सरसकट 25 हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी तातडीने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष ना.जयंत पाटील यांच्याकडे मंगळवारी (दि.28) केली आहे.
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, उस्मानाबाद जिल्ह्यातील मांजरा व तेरणा नद्या या गेल्या आठवडाभरामध्ये ओसंडून वाहत आहेत. अतिवृष्टीने या नद्या व याला जोडलेल्या उपनद्या, गाव ओढे, नाले यांच्यामुळे आजूबाजुच्या शेतीमधील हजारो हेक्टर काढायला आलेले सोयाबीनसह वाहून गेलेली शेतजमीन, हजारोंचे गोठे, शेती अवजारे, पशुधन इत्यादीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्यामुळे शासनाने या सगळ्यांची भरपाई म्हणून शेतकर्यांना सरसकट प्रती हेक्टरी 25 हजार रुपयाची तात्काळ मदत करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनात संजय पाटील दुधगावकर यांची स्वाक्षरी आहे.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा