वस्तिगृहाचे जनक हारवले-गंगाधर बनबरे
नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट
नांदेड येथील यशवंतराव चव्हाण मराठा मुलांचे वस्तिगृह यशस्वीपणे चालवणारे चंद्रभान पाटील जवळेकर यांचे २० सप्टेंबर रोजी ह्रदयविकाराने निधन झाले त्यांना आदरांजली वाहण्यासाठी यशवंतराव चव्हाण मराठा वस्तिगृह येथे शोकसभा घेण्यात आली.
१९८० पासुन नांदेड मधे ग्रामीण भागातुन येणाऱ्या मुलांना शिक्षण घेण्यासाठी कोणतीही अडचण आली नाही पाहीजे या उद्देशाने बंद पडण्याच्या मार्गावर असलेले वस्तिगृह आजतागयत चालु ठेवण्यासाठी चंद्रभान जवळेकरांनी प्रयत्न केला तेच खरे नांदेडमधील वस्तिगृहाचे जनक आहेत असे मत शोकसभेप्रसंगी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते गंगाधर बनबरे यांनी मत व्यक्त केले.मराठा मुलामुलींचे विवाह जुळण्यासाठी कोणतीही अडचण होवु नये म्हणून गेल्या वीस वर्षांपासून अखंडीतपणे
वधु वर परिचय केंद्र चालु त्यांनी व त्यांच्या सहकार्यांनी चालु ठेवला. माणस मेल्यावरच माणसाचे महत्व कळते हे न होता इथुन पुढे जिवंत असतांनाच महत्व कळाले पाहीजे.चंद्रभान जवळेकर व मधुकरराव देशमुख या दोघांची भीम आर्जुनाची जोडी होती.जवळेकरांच्या जिवनप्रवासावर आधारीत पुस्तिका निघाली पाहीजे असेही बनबरे म्हणाले.
ते मीतभाषी स्वभावाचे होते असे मत मराठा सेवा संघाचे जिल्हाउपाध्यक्ष पी.के.कदम यांनी मांडले.वस्तिगृहातुन अनेक मुले घडली त्यांची आदरयुक्त भीती आम्हा कार्यकर्त्यांना होती,त्यांचा शिस्तपणा कमी बोलणे यातुन मी घडलो असे मत संभाजी ब्रिगेड लोकसभा अध्यक्ष संकेत पाटील यांनी मत व्यक्त केले.त्याचे कार्य पुढे नेणे हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल असे मत मराठा सेवा संघाचे माजी जिल्हाध्यक्ष पंडीत कदम यांनी मत व्यक्त केले.मामाची शिस्त हीच त्यांची ओळख होती असे मत वस्तिगृहाचा माजी विद्यार्थी तथा विर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे जिल्हाध्यक्ष इंजि.प्रविण जाधव व्यक्त केले.
आपत्य नाही हे कधीही त्यांनी दिसु दिले नाही वस्तिगृहातील सगळे विद्यार्थी हेच आपले आपत्य आहेत असे ते मानत असत असे मत मराठा सेवा संघाने राष्ट्रीय सचिव नवघरे यांनी मत व्यक्त केले.
निर्मळ मणाचे पुरोगामी विचाराचे वारकरी ते होते
कोणतेही वयक्तीय स्वार्थ न ठेवता समाजोपयोगी काम करणारे असे जवळेकर होते असे मत मराठा सेवा संघाचे प्रशिक्षक प्रा.संतोष देवराये यांनी मत व्यक्त केले.
जिजाऊ ब्रिगेड चे आधारवड हरवले.ते वयस्कर कधीच वाटले नाहीत,युवकांना व महिलांना लाजवेल असे त्यांचे कार्य होते असे मत जिजाऊ ब्रिगेड चे जिल्हाध्यक्षा प्रा.अरुणा जाधव यांनी व्यक्त केले.मराठा मुले उद्योगात आले पाहीजे असे ते वेळोवेळी बोलायचे त्यांनी मला उद्योगात उभारी दिली असे मत उद्योजक आघाडीचे जिल्हाध्यक्ष धनंजय पाटील यांनी मत व्यक्त केले.मी मामाच्या मार्गदर्शनाने घडलो जवळेकर मामांना बघुन समाजकार्याची आवड निर्माण झाली त्यांचे विचार पूढे नेऊयात असे मत छावाचे प्रदेश कार्याध्यक्ष इंजि.तानाजी हुस्सेकर यांनी व्यक्त केले. त्यांचे मौनवृत च सगळ्यात मोठ कार्य होते असे मत इंजि.सुदेश देशमुख यांनी व्यक्त केले.प्रेरणादाई व्यक्तीमत्व हरवले
पाठीवरीत हात ठेवुन पुढे लढत रहा म्हणणारे जवळेकर मामा होते असे मत मराठा सेवा संघ जिल्हाध्यक्ष उद्धव सुर्यवंशी यांनी व्यक्त केले.श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी या पुरोगामी विचाराच्या ते मताचे होते असे मत मराठा सेवा संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य प्रा.डाॅ.पंजाब चव्हाण यांनी व्यक्त केले.सयंमी समाजकार्यात वाहुण घेतलेला एक स्नेही गमवला त्यांच्या विचाराने आपण सगळे वागणे हीच खरी आदरांजली ठरेल हे बोलत असतांना त्यांचे चाळीस वर्षापासुनचे मीञ मधुकरराव देशमुख हे भावुक होवुन त्यांना आश्रु आनावर झाले होते.यावेळी मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार,संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते गंगाधर बनबरे,केंद्रीय कार्यकारिणी सदस्य प्रा.डाॅ.पंजाब चव्हाण,छावाचे प्रदेश कार्याध्यक्ष इंजि.तानाजी हुस्सेकर,मधुकरराव देशमुख,इंजि.शे.रा.पाटील,शिवाजी खुडे,मराठा सेवा संघ जिल्हाध्यक्ष उद्धव सुर्यवंशी, नानाराव कल्याणकर,जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्ष अरुणा जाधव,संतोष देवराये,संभाजी ब्रिगेड लोकसभा अध्यक्ष संकेत पाटील,संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष शाम पाटील,भगवान कदम,श्रीनिवास शेजुळे, सुभाष कोल्हे,आंकुश कोल्हे, राधाकृष्ण होगे,पंडीत कदम,पी.के.कदम,विर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे जिल्हाध्यक्ष इंजि.प्रविण जाधव यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती तर मराठा सेवा संघ जिल्हासचिव रमेश पवार यांनी संचलन केले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा