Breaking

मंगळवार, २८ सप्टेंबर, २०२१

उमरगा येथे बालाजी गायकवाड यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा*




*उमरगा येथे बालाजी गायकवाड यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा*

उमरगा:- दिनांक २८ सप्टेंबर २०२१, रोजी बहुजन रयत परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष बालाजी गायकवाड यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी 100 वेळेस रक्तदान करणारे सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब आंबेकर हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष प्रदीप जाधव, धीरज बेलमकर,नाट्यअभिनेते वाय.एस.शिंदे, लोहारा तालुका काँग्रेस सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष केशवराव सरवदे. ग्रा.पं.सदस्य वाघंबर सरवदे, बजरंग दल चे अतुल कुलकर्णी,राघवेंद्र कुलकर्णी, दादासाहेब सरवदे हे उपस्थित होते

यावेळी सर्व मान्यवरांनी श्री गायकवाड यांच्या सामाजिक कार्याची स्तुती करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा,सुमित कोथिंबिरे यांनी केले. आभार  प्रा सुखदेव होळीकर यांनी मानले.

प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा