पिलीव येथील यशवर्धन गोरे याची चंद्रपूर येथील सैनिक स्कुलमध्ये निवड
पिलीव प्रतिनिधी -
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील यशवर्धन जयंत गोरे याची चंद्रपूर येथील सैनिक स्कुलमध्ये निवड झाली आहे. तो सिंहगड पब्लिक स्कुल कोर्टी ( पंढरपूर) याठिकाणी पाचवी मध्ये शिकत असतानाच शैक्षणिक वर्ष 2021-22 या वर्षाच्या शैक्षणिक सत्रासाठी झालेल्या डीफेन्स कँटेगिरी पात्रता परीक्षेमध्ये त्याने हे सुयश मिळवीले.संपूर्ण देशभरातून दरवर्षी घेण्यात येणाऱ्या या परीक्षेत पात्र होण्यासाठी विद्यार्थ्यांना लेखी व वैद्यकीय चाचणीला सामोरे जावे लागते. यशवर्धन याचे वडील जयंत शंकरराव गोरे हे क्रुषी पदवीधारक असुन ते शेती व्यवसाय करतात तर आई विजयालक्ष्मी या सिंहगड पब्लिक स्कुलमध्ये शिक्षीका आहेत. ग्रामीण भागात असुनही यशवर्धन याने नेत्रदीपक कामगिरी केल्याबद्दल त्याचे विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्या कडून अभिनंदन व कौतुक होत आहे. यशवर्धन हा माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील असुन तो पंढरपूर येथील सिंहगड पब्लिक स्कुलमध्ये शिक्षण घेत होता .त्याला आई - वडील, शिक्षक ,तसेच पंढरपूर येथील आयकाँन इन्स्टिट्यूट चे भोसले सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. चंद्रपूर येथील सैनिक स्कुल येथे राष्ट्रीय संरक्षण अकँडमी ( एनडीए) च्या प्रवेशासाठी मुलांना शैक्षणिक ,शारिरीक, मानसिक दुष्टया तयार करण्याच्या उद्देशाने देशभरातील मुलांची स्पर्धा परीक्षेद्वारे निवड केली जाते. सैनिक स्कुलसाठी माझी निवड होण्यामध्ये माझे आई ,वडील, काका,आजी,भोसले सर यांनी मला वेळोवेळी प्रेरीत करून मार्गदर्शन केल्यामुळेच हे यश मिळाल्याचे यशवर्धन याने सांगितले. यशवर्धन याच्या या यशाबद्दल सिंहगड पब्लिक स्कुलच्या प्राचार्या नवले मँडम, सिंहगड चे कँम्पस डायरेक्टर डॉ कैलास कारंडे,पिलीव ग्रामपंचायत सदस्य जिवन गोरे यासह विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्या कडून यशवर्धन चे अभिनंदन व कौतुक होत आहे. फोटो - यशवर्धन गोरे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा