*तुळजापुर कृषी विज्ञान केंद्र येथे तालुकास्तरीय रान भाजी महोत्सव साजरा करण्यात आला*
सदर महोत्सवाचे उद्घाटन पंचायत समिती सभापती सौ रेणुका इंगोले यांनी केलं .तुळजापुर तालुक्यामध्ये कृषी विज्ञान केंद्र येथे रान भाजी महोत्सव साजरा करण्यात आला त्यावेळी बोलताना पंचायत समिती उपसभापती दत्तात्रय शिंदे यांनी कृषी विभागाने असा उपक्रम राबविला त्याचे कौतुक केलं .
रणभाज्याचे महत्व या विषयावर कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञ वर्षा मारवलीकर यांनी सविस्तर असे मार्गदर्शन केले.सचिन सूर्यवंशी सर यांनी दैनंदिन जीवनात रानभाज्या कश्या उपयुक्त आहेत याचे मार्गदर्शन केले .तालुका कृषी अधिकारी गायकवाड यांनी रानभाज्या लागवड जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कराव्यात याचे मारगदर्शन केले सदर कार्यक्रमात रानभाज्या ची रेसिपी बनवल्या बद्दल सौ रेश्मा राऊत या महिला शेतकऱ्याचा सन्मान करण्यात आला सैलाजा नरवाडे या महिला शेतकऱ्याने स्वतःची बियाणे बँक कश्या पद्धतीने बनवली याची माहिती दिली.हवामान श्यास्त्राची माहिती नकुल हर्वडिकर यांनी दिली . सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री वैभव लोंढे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा तुळजापुर यांनी केले.तर समारोप श्री सचिन सूर्यवंशी यांनी केले.कार्यक्रमास तालुक्यातील सर्व शेतकरी उपस्थित होते.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा