Breaking

गुरुवार, १२ ऑगस्ट, २०२१

अडचणीत असणाऱ्या माण बाजार समितीच्या कार्यालयाकडे कोण लक्ष देणार ? संचालक बदलले मात्र प्रशासकीय व्यवस्थापन बदलण्याची गरज



अडचणीत असणाऱ्या माण बाजार समितीच्या कार्यालयाकडे कोण लक्ष देणार ?

संचालक बदलले मात्र प्रशासकीय व्यवस्थापन बदलण्याची गरज

वडूज प्रतिनिधी / शरद कदम 

           माण पंचायत समितीचे संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच पार पडली. यामध्ये भाजप व रासप युतीला दहा जागा मिळाल्या तर राष्ट्रवादी व आघाडीला सात जागा मिळाल्या अशा सतरा जागेची निवडणूक शांततेत पार पडली. मात्र यामध्ये भाजप व रासपचे बहुमत सिद्ध झाले. बाजार समितीच्या मुख्य कार्यालयाचे अवस्था अतिशय बिकट आहे असे चित्र सध्या दिसत आहे.
          माण बाजार समितीचे दहिवडी येथे मुख्य कार्यालय आहे.या कार्यालयामध्ये बाजार समितीचे संचालक व प्रशासकीय व्यवस्थापन काम करत आहेत. मात्र कार्यालय इमारतीची अवस्था बिकट झाली असून पावसाच्या पाण्यामुळे काही ठिकाणी गळती सुद्धा लागले आहे. तर कार्यालय मध्ये असणारे साहित्य व्यवस्थित ठेवण्यात आले नाही. बाजार समितीमध्ये सत्ता कोणत्याही पक्षाची आली तरी शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले जात नाहीत. त्यामुळे आजही बाजार समितीच्या संचालक मंडळावर शेतकरी नाराज असल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे. त्यामुळे आता नवीन संचालक मंडळ तरी शेतकऱ्यांच्या हिताचे काम करणार का? असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे.
         नवीन होणाऱ्या  सभापतीने सर्व संचालक मंडळाला विश्वासात घेऊन शेतकरी, व्यापारी, ग्राहक यांच्या हिताचे निर्णय घेणे गरजेचे आहे. नवीन आलेल्या संचालक मंडळाला प्रशिक्षण दिले पाहिजे. बाजार समितीने सोशल मीडिया वेबसाइईट यासारख्या आधुनिक माध्यमांचा वापर करून शेतकऱ्यांच्या विकासासाठी प्रयत्न करणे महत्वाचे ठरेल. माण बाजार समितीच्या विकास करण्यासाठी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री व सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना सर्व सतरा संचालकांनी प्रत्यक्ष भेटून निधी मागण्याची गरज आहे. मंत्री बाळासाहेब पाटील जिल्ह्याचे कारभारी आहेत त्यांनी दुष्काळी भागात असणाऱ्या दहिवडी येथील बाजार समितीला निधी देण्याची गरज आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा