Breaking

गुरुवार, १२ ऑगस्ट, २०२१

उस्मानाबाद शहरात,15 ऑगस्टला 144 कलम लागू


उस्मानाबाद शहरात,15 ऑगस्टला 144 कलम लागू


 
 उस्मानाबाद,दि.12 :-स्वातंत्र्य दिनाचा राष्ट्रध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम दि.15 ऑगस्ट, 2021 रोजी पालकमंत्री यांच्या शुभ हस्ते सकाळी ठिक  9.05 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रांगणात होणार आहे. ध्वजारोहणाच्या कार्यक्रमादिवशी  विविध मागण्या संदर्भात लोक संघटना, पक्ष, कार्यकर्ते हे जिल्हाधिकारी  कार्यालयासमोर उपोषण, धरणे, मोर्चा, रॅली अशा कार्यक्रमांचे आयोजन करतात.
      त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी  कार्यालयाच्या प्रांगणामध्ये तसेच श्री.छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळ्यापासून ते सर्कीट हाऊस शिंगोली पर्यंत ध्वजारोहणाच्या दिवशी  उपद्रव कमी करण्यासाठी तसेच आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्यात येऊ नये. यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973  कलम 144 लागू करणे आवश्यक आहे.

त्यामुळे उपविभागीय दंडाधिकारी योगेश भिमराव खरमाटे यांनी उस्मानाबाद तालुका फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करुन दिनांक. 14 ऑगस्ट, 2021 चे 00.00 ते दिनांक 15 ऑगस्ट, 2021 चे 24.00 वाजेपर्यंत उस्मानाबाद येथील श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ते सर्कीट हाऊस, शिंगोली पर्यंत धरणे, उपोषण, ध्वनीक्षेपकाचा वापर, मोर्चा इ. आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्यास प्रतिबंध करण्याचे आदेश दिले आहेत.

प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा