Breaking

बुधवार, ११ ऑगस्ट, २०२१

*डॉ तानाजीभाऊ जाधव समाजरत्न पुरस्काराने सन्मानित*



*डॉ तानाजीभाऊ जाधव समाजरत्न पुरस्काराने सन्मानित*


*करमाळा तालुका प्रतिनिधी- अतुल वारे पाटील*

       टायगर ग्रुप अध्यक्ष तानाजीभाऊ जाधव यांना पूरग्रस्तांसाठी दिलेल्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल 
पुणे येथे समाजरत्न पुरस्कार 2021 ने सन्मानित करण्यात आले.
         पुणे विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य राजेश पांडे यांच्या वाढदिवसानिमित्त कोकणातील पुरग्रस्तांसाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिलेदारांचा विशेष सन्मान करण्यात आला.
      यावेळी पुणे महानगरपालिका महापौर मुरलीधर मोहोळ, प्रा डॉ करमळकर ,क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी अनंत ताकवले,,जेष्ठ कवी व चित्रपट दिग्दर्शक रामदास फुटाणे, कवी नारायण पुरी,बांदा जोशी,भारत दौंडकर उपस्थित होते.
      उपस्थितांनी टायगर ग्रुपच्या कार्याचे तोंड भरून केले. विशेषतः नैसर्गिक आपत्तीच्या वेळी टायगर ग्रुप करत असलेल्या मदतीचीही सर्वांनी प्रशंसा केली.
       सत्काराला उत्तर देताना डॉ तानाजीभाऊ म्हणाले की, मुळातच टायगर ग्रुपची स्थापना ही समाजसेवेसाठी करण्यात आली आहे.  संपूर्ण भारतात टायगर ग्रुपचे कार्यकर्ते कार्यरत आहेत. ज्यावेळी महापूर, अतिवृष्टी आणि इतर आपत्ती यामुळे समाज नेस्तनाबूत होतो अशावेळी समाजातील प्रत्येक घटकाने आपली जबाबदारी स्वीकारून टॅन मन धनाने लोकसेवा केली पाहिजे. याच विचारातून टायगर ग्रुपने कोकणातील अतिवृष्टीमुळे बाधित नागरिकांना मदत केली. यापुढेही टायगर ग्रुप अशीच जनसेवा करत राहणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा