Breaking

बुधवार, ११ ऑगस्ट, २०२१

संभाव्य कोरोना निर्बंधांना करमाळ्यातील व्यापाऱ्यांचा तीव्र विरोध*



*संभाव्य कोरोना निर्बंधांना करमाळ्यातील व्यापाऱ्यांचा तीव्र विरोध*


*करमाळा तालुका प्रतिनिधी- अतुल वारे पाटील*

        गेल्या दीड वर्षापासून वारंवार होत असलेल्या लॉकडाउनमुळे तालुक्यातील अत्यावश्यक सेवेत नसलेले सर्व लहान मोठे व्यापारी अगोदरच मेटाकुटीला  आले असताना करमाळा सह 5 तालुक्यात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी 13 ऑगस्ट 2021 पासून कडक निर्बंध लागू करण्यासंदर्भात आदेश काढले आहेत.
 या आदेशाला विरोध करण्यासाठी  करमाळा चेंबर ऑफ कॉमर्स च्या वतीने शहरातील सर्व व्यापाऱ्यांच्या वतीने तहसीलदार  यांच्या वतीने नायब तहसीलदार जाधव साहेब यांना निवेदन देण्यात आले शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहून या लॉक डाऊन ला आपला विरोध दर्शविला.

        या वेळी जगदीश आगरवाल,महेश चिवटे,जितेश कटारिया,अभिषेक आव्हाड,लखन ठोंबरे,गणेश चिवटे,भाऊसाहेब आरणे,चेतन किंगर,पप्पू सिंधी,राहुल कातुळे,हरिभाऊ कोकाटे,यशराज दोषी,दर्शन चांकेश्वरा,संदीप चुंग,अमित सोळंकी,राजेश कटारिया,अशोक दोशी,मयूर देवी,अभिनव देवी,गजराज चिवटे,विष्णू उबाळे यांच्यासह
हॉटेल असोसिएशन,कापड असोसिएशन,इलेट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स व वायरमन,मोबाईल दुकानदार,फॅब्रिकेशन संघटना,नाभिक संघटना,गटई कामगार संघटना व कुशन विक्रेते,प्रिंटिंग प्रेस संघटना,फोटोग्राफर्स & व्हिडिओग्राफर्स असोसिएशन,हार्डवेअर व प्लंबर,स्टेशनरी 


दुकानदार,भांड्यांचे व्यापारी,ऑटोमोबाईल्स व मेकॅनिकल ,ऑनलाईन, टायपींग व झेरॉक्स,हातगाडी विक्रेते,सराफ व गाठणारे,चप्पल व बुट विक्रेते दुकानदार,फळे व भाजी विक्रेते,मिठाई व बेकरी पदार्थ विक्रेते,इस्त्री व्यवसायीक,टेलरिंग दुकानदार ,आडत व्यापार,सायकल विक्रेते,डिजिटल फ्लेक्स प्रिंटिंग,फर्निचर व सुतारकाम कारागीर इत्यादींनी या कडक निर्बंध विरोधात सहभागी होऊन पाठिंबा दिला.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा