सातारा जिल्हा नियोजन समितीवर राजकीय पक्षांना महिलांवर भरोसा नाही का?
वडूज प्रतिनिधी / शरद कदम
छत्रपती शिवराय यांची राजधानी असलेल्या सातारा जिल्ह्यात एक ही महिला खासदार,आमदार नाहीत.आता तर चक्क सातारा जिल्हा नियोजन समितीवर सुध्दा सर्वच राजकीय पक्षांनी महिलांना डावलून मनुवादी विचारांची पाठराखण केल्याची तसेच गुणवान महिलांवर भरोसा नाही का? अशी सामान्य महिलावर्गाकडून टीका होऊ लागली आहे.
नायगाव ता.खंडाळा येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलें, धावडशी ता सातारा येथील राणी लक्ष्मीबाई यांच्या पराक्रमाची गाथा आज ही सांगितली जाते. पण सातारा जिल्ह्यातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस या ब्रम्ह, विष्णू, महेश समजणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने सातारा जिल्हा नियोजन समितीच्या निवडीत महिलांना खड्या सारखे बाजूला करून या नारी शक्तीचे खच्चीकरण केले आहे. या समितीवर वीस कार्यकर्त्यांचे पुनर्वसन करताना जातीय झुकते माप देण्यास सर्व राजकीय पक्षांनी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. पण, एकाही महिलेला समितीवर स्थान दिले नाही.
राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्री, वरिष्ठ नेत्या म्हणून अनेक महिलांनी कार्य केले आहे. त्याच पक्षातील स्थानिक नेत्यांना सातारा जिल्हा नियोजन समितीवर निवड करण्यासाठी सक्षम महिला मिळू शकल्या नाहीत. याची नोंद घ्यावी लागली आहे. राजकीय पक्षांचे कार्यक्रम, उदघाटन अशा वेळी फित कापण्यासाठी साहित्य व पुष्पगुच्छ, हार, शाल घेऊन येण्यासाठी महिलांना बोलवावे लागते. स्वागत गीतांसाठी ही निमंत्रण दिले जाते. पण, समितीवर निवड केली जात नाही. आज ही सातारा जिल्ह्यात पुरुषप्रधान संस्कृती जपली गेली आहे. अशी रास्त शंका येत आहे. शिवसेना- छाया शिंदे, शारदा जाधव, राष्ट्रवादी- समिंद्रा जाधव, गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी, भाग्यश्री भाग्यवंत, स्मिता देशमुख काँग्रेस-रजनी पवार, धनश्री महाडिक व इतर किमान तेहतीस टक्के महिलांना संधी मिळणे अपेक्षित होते.
आता ज्या कार्यकर्त्यांना संधी दिली आहे. त्यांना मातब्बर नेतेगण समितीच्या बैठकीत बोलून देतील का? का त्यांची ही मुस्कटदाबी होईल? हे येणारा काळच ठरविलं असे चित्र दिसत आहे. दरम्यान, सातारा जिल्ह्यात जिल्हा नियोजन समिती मध्ये महिलांना डावलून सुध्दा एका ही महिला पदाधिकारी यांनी राजकीय पक्षांचा साधा निषेध व्यक्त न केल्याने नवल वाटू लागले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा