Breaking

बुधवार, २५ ऑगस्ट, २०२१

शिवसेना आणि युवासेने मधील काही कार्यकर्त्यांचे आरोप खोटे-जयराज गोरे....



शिवसेना आणि युवासेने मधील काही कार्यकर्त्यांचे आरोप खोटे-जयराज गोरे....


श्रीगोंदा-नितीन रोही

श्रीगोंदा शहरात शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी बैठक घेत शिवसेनेच्या विद्यमान प्रमुख कार्यकर्त्यांविरुद्ध तक्रार केली त्यात काही तथ्य नसुन दिशाभूल करण्याचा प्रयत्न चालवल्याचा खुलासा युवासेना उप शहर प्रमुख जयराज गोरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे पत्रकात गोरे यांनी म्हटले आहे की बैठक घेणार यामधील काही पदाधिकारी यांनी अनेक निवडणुकांमध्ये पक्षाचे धनुष्यबाण खाली ठेवले आहे आज रोजी नवे पदाधिकारी वरिष्ठांनी निवडले ते शिवसेना पक्ष प्रमुख यांच्या आदेश असताना शिव संपर्क अभियान मध्ये भाग घेतला नाही व तालुकाप्रमुख संपर्क अभियान प्रभावीपणे राबवत आहेत नव्या पदाधिकाऱ्यांनी काल बैठक घेणाऱ्या पदाधिकाऱ्यांना अभियानात सहभाग घेण्यासाठी तोंडी सांगितले फोन देखिल केला परंतु ते उपस्थित राहिले नाहीत पक्षापेक्षा कोणी मोठा नाही परंतु या गैरहजर  राहणाऱ्यानी यातून पक्षा शी देणे घेणे नसल्याचे दाखवून दिले. बैठक घेणाऱ्यांनी यापूर्वी पक्षवाढीसाठी काय केले हे त्यांना चांगले माहीत आहे यातील काहीजण शिवसेनेवर टीका करणाऱ्यांच्या गोटात सामील होऊन विविध प्रश्नांचे निवेदन देताना व वाढदिवसाचे शुभेच्छा देताना सर्वांनी पाहिले आहे आता ते म्हणतात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांमध्ये यश मिळण्यासाठी आम्हाला जबाबदारी द्या त्यांनी यापूर्वी काय केले वरिष्ठांना माहीत असल्याने ते त्यांची मागणी मान्य करणार नाहीत याची आम्हाला खात्री आहे असेही गोरे यांनी म्हटले आहे आणि शिवसेनेमध्ये काही तक्रारी असल्यास संपर्क प्रमुख , जिल्हाप्रमुख यांच्याकडे दाद मागायची असते परंतु अशा बैठका घेऊन नव्या पदाधिकाऱ्यांना भीती दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे परंतु नवे पदाधिकारी संपूर्ण तालुक्यात फिरून जि.प. गट गण मध्ये दररोज फिरून तेथील समस्या जाणून घेऊन वरिष्ठांना अहवाल देत आहेत असा प्रयत्न बैठक घेणाऱ्यांनी कधी केला होता का असा सवाल गोरे यांनी पत्रकात शेवटी केला आहे.

फोटो,

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा