माढा तालुक्यातील खंडित केलेल्या कृषी पंपाचा वीज पुरवठा सुरळीत - जि.प.सदस्य रणजितसिंह शिंदे
तहसीलदार व महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे केलेल्या पाठपुराव्याला यश
माढा / प्रतिनिधी - मागील आठ दिवसापासून महावितरण कंपनीने माढा तालुक्यातील कृषी पंपाच्या थकित बिलापोटी वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम कोणतीही पूर्वसूचना न देता हाती घेतली होती त्यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होत होता या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी माढ्याचे तहसीलदार राजेश चव्हाण व महावितरण कंपनीचे अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे व दूरध्वनीवरून कृषी पंपाचा वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी शेतकऱ्यांच्या वतीने सोमवारी केली होती त्या मागणीला यश आले असून माढा तालुक्यातील खंडित केलेल्या ठिकाणचा कृषी पंपाचा वीज पुरवठा तातडीने मंगळवारी सुरू केल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह सिंह शिंदे यांनी दिली.
माढा तालुक्यातील मानेगाव,माढा, कुर्डूवाडी,उपळाई बुद्रुक,उपळाई खुर्द आदी सब स्टेशन मधून कृषी पंपांना होणारा वीज पुरवठा महावितरण कंपनीने खंडित केल्यामुळे शेतातील उभी पिके जळू लागली होती व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनल्याची बाब प्रशासन व महावितरणच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन कृषी पंपाचा वीज पुरवठा सुरू केला आहे त्यामुळे महावितरण कंपनी व जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे यांचे आभार धानोरे देवी येथील शेतकरी तानाजी देशमुख,विलास देशमुख उपळाई खुर्दचे सरपंच संदीप पाटील, सुरेश पाटील,संतोष जाधव,अंजनगाव खेलोबाचे भागवत चौगुले,प्रदिप चौगुले,नानासाहेब वाघमोडे, विठ्ठलवाडीचे बालाजी गव्हाणे, नारायण खांडेकर,रामचंद्र भांगे, हनुमंत शिंगाडे,कुंभेजचे मदन आलदर,सुभाष नागटिळक यांच्यासह या भागातील अनेक शेतकऱ्यांनी मानले आहेत.
या भागातील शेतकऱ्यांनी कृषी पंपाचे वीज बिलापोटी मार्च 2021 मध्ये महावितरणकडे रक्कम भरली होती परंतु त्यानंतर मात्र कृषी पंपाचे वीज बिल थकीत आहे त्यामुळे कंपनीच्या धोरणानुसार वीज पुरवठा खंडित केला होता परंतु जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे यांनी सोमवारी निवेदन व दूरध्वनीद्वारे आमच्याकडे मागणी करून वस्तुस्थिती सांगितली तेंव्हा काही दिवसांची मुदत देऊन कृषी पंपाचा वीज पुरवठा सध्या सुरळीत केला आहे परंतु शेतकऱ्यांनी ताबडतोब किमान कृषीपंपाचे चालू बिल भरावे तसेच महावितरण कंपनीच्या कृषी संजीवनी योजनेचा लाभ घेऊन सवलतीची रक्कम भरून कृषी पंपाचे पूर्ण थकीत बिल भरून निरंक व्हावे असे आवाहन महावितरण कंपनीच्या बार्शी कार्यालयाचे कार्यकारी अभियंता दिपक लहामगे व माढा महावितरणचे सहाय्यक अभियंता वैभव पळसकर यांनी केले आहे.
फोटो ओळी - जि.प.सदस्य रणजितसिंह शिंदे


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा