Breaking

गुरुवार, १९ ऑगस्ट, २०२१

आढेगाव येथील दानशूरांनी केले शाळेचे सुशोभीकरण*


*आढेगाव येथील दानशूरांनी केले शाळेचे सुशोभीकरण*


भिमानगर प्रतिनिधी


 दि. 19 ऑगस्ट ठिकाण आढेगाव तालुका माढा जिल्हा सोलापूर 
कै. विठ्ठलराव शिंदे विद्यालय आढेगाव या प्रशाले ला आढेगाव व परिसरातील सन्माननीय व्यक्तींनी बांधकाम साहित्य, सुशोभीकरण साहित्य, विद्यार्थ्यांना बक्षिसे इत्यादी साहित्य देऊन शाळेच्या सुशोभीकरणास मदत केली.

 *दानशूरांमध्ये श्री त्रिमूर्ती कन्स्ट्रक्शन  चे मालक श्री नागनाथ चव्हाण यांनी 6 ब्रास पेव्हर ब्लॉक आणि 7 ब्रास  डस्ट ( खडी) देणगी म्हणून गावातील श्री बाळासाहेब वाघ  व नागनाथ वाघ  यांनी प्रत्येकी 2 -2 ब्रास पेव्हर ब्लॉक्स ,वस्तूरुपाने दिले तर  आढेगावचे सुपुत्र  डॉ .श्री  दत्तात्रय मारकड साहेब (वैद्यकीय अधिकारी श्रीवर्धन  ता. चिपळूण) यांनी गुणवंत व होतकरू विद्यार्थ्यांना 8000रू.रोख बक्षीस दिले.*
*शालेय परिसर हिरवागार करण्यासाठी एम.जे.टेक्नो प्लास्ट इंडस्ट्री,टेंभुर्णी यांनी वेगवेगळ्या जातीची 500 झाडे व या झाडांना पाण्यासाठी ड्रीप पाईप मोफत दिले.*
परिसरातील या व्यक्तींच्या या मदतीच्या संदर्भात म्हणावेसे वाटते 'वर्गणी देऊन मंदिर बांधण्यापेक्षा देणगी देऊन ज्ञान मंदिरे उभी करणारे हे देणगीदार समाजासाठी एक दीपस्तंभ आहेत' .
 समाजातील होतकरू विद्यार्थ्यांना केलेली मदत ही मंदिरांना दिलेल्या दाना पेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहे असे मत  माननीय श्री अजय चव्हाण यांनी व्यक्त केले . या प्रसंगी श्री बाजीराव वाघ साहेब हे अध्यक्ष म्हणून तर प्रमुख पाहुणे  म्हणून श्री विजय चव्हाण हे उपस्थित होते .
या कार्यक्रमासाठी माननीय श्री बाळासाहेब वाघ श्री नागनाथ वाघ .श्री साहेबराव पारेकर ,श्री अंगद निकम ,विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री बंडू जाधव सर, सहशिक्षक श्री बिरू जवळगे सर, श्री बाळू चोपडे सर ,श्री कावळे सर ,श्री राजेंद्र वाघ सर व सर्व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .याप्रसंगी निवेदन व  उपस्थितांचे आभार श्री विजय जगताप सर यांनी केले.

चौकट

आज समाजात आपण पहातो मंदिरांना लाखोची देणगी दिली जाते.परंतू ज्ञान मंदिरांना दान देण्याची हि पहिलीच घटना असल्याने यादानशुरांचे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातून कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा