*सोलापूर जिल्ह्यातील पाच तालुक्यांच्या लाॅकडाऊन घोषणेमागे पालकमंत्र्यांचाच हात*
*रयत क्रांतीचे प्रा सुहास पाटील*
टेंभुर्णी (प्रतिनिधी)- सोलापूर जिल्ह्यातील पाच तालुक्यांच्या लॉक डाऊनच्या घोषणे मागे पालक मंत्री दत्तात्रय भरणे हेच जबाबदार आहेत.जिल्ह्यामध्ये कोरोना लाटीमध्ये पालकमंत्र्यांनी दुर्लक्ष केले.त्यामुळे आजही सोलापूर जिल्ह्यावरील कोरोनाचे संकट दुर होऊ शकले नाही,याला सर्वस्वी पालकमंत्रीच जबाबदार आहेत. असे रयत क्रांती संघटनेचे जिल्हा संपर्कप्रमुख तथा दिशा समिती सदस्स प्रा सुहास पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले आहे.स्वतःच्या ईंदापूर तालुक्यात व शहरात कोरोनाचे रूग्ण सापडत असताना तेथील विरोधक हे प्रबळ असून तेथे लाॅकडाऊनचा विचारसुद्धा करत नाहीत.व आमच्या माढा तालुक्यातील लोकप्रतिनींचे कोरोना साथीकडे पुर्णपणे दुर्लक्ष आहे,या संधीचा गैर फायदा पालकमंत्री घेत आहेत,असे सध्यातरी दिसत आहे.सोलापूर जिल्ह्यातील कोराना वाढीच्या कारणावरून पाच तालुक्यांमध्ये १३ ऑगस्ट पासून पालकमंत्र्याच्या आदेशान्वये जिल्हाधिकार्यांनी लाॅकडाऊनची घोषणा केली आहे. जर पाच तालुक्यांमध्ये लाॅकडाऊनची अंमलबजावणी झाली तर जिल्ह्यातील व्यापारी देशोधडीला लागुन आत्महत्या केल्याशिवाय रहाणार नाही.सध्या माढा तालुक्यामध्ये टेंभूर्णी,कुर्डूवाडी,माढा व मोडनिंब ही शहरे जास्त लोकसंख्येंची आहेत.या शहरांमध्ये कोरोना रूग्णांची संख्या कमी सापडत आहे.तालुक्यात ग्रामीण भागामध्ये कोरोना रूग्णांची संख्या जास्त आहे.तरी ज्या भागात व गावांमध्ये कोरोना रूग्ण आहेत तोच भाग कंटोनमेंट भाग जाहीर करून तेथे संचारबंदी लागू करावी.व ईतर भाग लाॅकडाऊनच्या घोषणेतुन मुक्त करावेत.तालुक्यातील व्यापारी वर्ग,लहान मोठे व्यावसायीक,जनता कर्जाच्या विळख्यात सापडली आहे

.याकडे आपल्या लोकप्रतिनींधीचे लक्ष नाही.तरी माढा तालुक्यातील व्यापारी संघटनांनी विरोध केला आहे.त्यांना रयत क्रांती संघटनेच्या वतीने जाहीर पाठींबा असेल.तरी पालकमंत्र्यांनी प्रशासन व आरोग्य व्यवस्था याकडे अधिक लक्ष दिले तर कोरोना आटोक्यात येईल.लोकसंख्येच्या प्रमाणात लसीकरणातही सोलापूर जिल्ह्यावर अन्याय झाला आहे.याला सर्वस्वी पालकमंत्री व प्रशासन जबाबदार आहे.असे प्रा सुहास पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकात सांगितले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा