Breaking

बुधवार, ११ ऑगस्ट, २०२१

सोलापूरचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास भोसले यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन*


*सोलापूरचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास भोसले यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन*


*टेंभुर्णी ,बेंबळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे*
*माढा (प्रतिनिधी) :-**सोलापूर शहराचे सहाय्यक पोलीस आयुक्त   सुहास भोसले यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. 
ते सोलापूर येथील जिम मध्ये व्यायामसाठी गेले असताना त्यांना हृदयविकाराचा जोरदार झटका आला त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याची समजते.
माढा तालुक्यातील बेंबळे गावचा एक चांला कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्याने पोलीस प्रशासनाला धक्का बसला असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

सुहास भोसले हे माढा तालुक्यातील टेंभुर्णी जवळ असणाऱ्या बेंबळे गावचे पुत्र  असून ते विभाग १ एक याठिकाणी विभागीय सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत होते, जेलरोड पोलीस ठाण्याच्या बाजुला हे कार्यालय होते. 
१ एप्रिल २०२१ रोजी ते अमरावती हून सोलापूरात जॉईन झाले होते,
 मृत्यू समयी त्यांचे वय ५६ असून त्यांच्या पश्चात आई,पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. 
त्यांच्या मृत्यूची माहिती कळताच  हॉस्पिटलमध्ये पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांनी गर्दी केली होती ही माहिती माढा तालुक्यात कळताच टेंभुर्णी, बेंबळे या परिसरात राजकीय व्यापारी शेतकरी व त्यांच्या निकटवर्ती मित्रातून हळहळ व्यक्त होत आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा