*भा,ज,पा करमाळा तालुका समर्थ बुथ अभियान संपन्न*
*करमाळा तालुका प्रतिनिधी- अतुल वारे पाटील*
करमाळा तालुका भाजपाच्या वतीने गुरुप्रसाद मंगल कार्यालय करमाळा येथे समर्थ बुथ अभियान खा,रणजितसिंह नाईक निंबाळकर व जिल्हा अध्यक्ष श्रीकांत दादा देशमुख यांच्या उपस्थितीत तालुका अध्यक्ष गणेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली पार पडले .
सदर अभियानाची सुरुवात दीप प्रज्वलन व भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून करण्यात आले. तदनंतर प्रास्ताविक तालुका अध्यक्ष गणेश चिवटे यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी संपूर्ण अभियानाचा आढावा मान्यवरांसमोर मांडून आगामी काळात राहिलेली रचना पूर्ण करून 17 सप्टेंबर पूर्वी सर्व बुथ रचना व बैठका पूर्ण करू असे आश्वासन दिले. यावेळी जिल्हा सरचिटणीस किरण बोकन ,माजी जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठलराव भणगे, सातारा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे यांनी आपली मनोगत व्यक्त केले.
जिल्हा अध्यक्ष श्रीकांत दादा देशमुख यांनी सर्व तालुक्याचा आढावा घेतला व शक्ती केंद्रप्रमुख व बुथ प्रमुखांना मौलिक मार्गदर्शन करून त्यांच्यामध्ये आगामी सर्व निवडणुकी करिता चेतना येईल अशा आशयाचा कानमंत्र दिला .समारोप खा. रणजितसिंह दादा नाईक निंबाळकर यांनी केला. त्यांनी त्यांच्या समारोपप्रसंगी बोलताना कार्यकर्त्यांची कोणतीही अडचण समजून घेऊन तिचे निरसन केले जाईल असे आश्वासन कार्यकर्त्यांना दिले तसेच 17 सप्टेंबर पूर्वी मी पाच दिवस करमाळा तालुक्यामध्ये राहून प्रत्येक शक्ती केंद्रापर्यंत जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेणार आहे असे सांगितले .तसेच करमाळा तालुक्यामध्ये स्वतंत्र संपर्क कार्यालय चालू करण्याचा मानस व्यक्त केला व या ठिकाणी एक स्वीय सहाय्यक ठेऊन त्याच्या व तालुकाध्यक्ष यांच्यामार्फत सर्व जनतेच्या कामाची सोडवणूक केली जाईल असे सांगितले .आभार प्रदर्शन तालुका चिटणीस अजिनाथ सुरवसे यांनी केले तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवान गिरी गोसावी यांनी केले
.
सदर प्रसंगी उपस्थित राज्य परिषद सदस्य बाळासाहेब कुंभार, माढा लोकसभा विस्तार शरद झेंडे, महाराष्ट्र चॅम्पियन पै अफसर जाधव,सरचिटणीस काकासाहेब सरडे , अमर साळुंखे,तालुका उपाध्यक्ष रामभाऊ ढाणे दादासाहेब देवकर, दत्तात्रय पोटे , मच्छिंद्र हाके, अशोक ढेरे,युवा मोर्चा तालुका अध्यक्ष सचिन गायकवाड, किसान मोर्चा तालुका अध्यक्ष विजयकुमार नागवडे ,महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा धनश्री ताई खटके पाटील,अश्विनी भालेराव ,
भाग्यश्री कुलकर्णी ,सुमन नाळे , राजश्री खाडे, चंपावती कांबळे, ओबीसी मोर्चाचे धर्मराज नाळे, भैया गोसावी, किरण वाळुंजकर,जंयत काळे पाटील, युवराज किरवे,मयुर देवी, अशोक मोरे ,बाळासाहेब हौसिंग, मोहन शेंडे, मोरे प्रवीण बिनवडे प्रदीप महाराज ढेरे, आश्रू दुधाट,सुरज शेख, प्रदिप देवी,संजय घोरपडे,सुहास ओहोळ, गणेश माने,मस्तान कुरेशी वसीम सय्यद, भैया कुंभार, सचिन ढाणे,मनोज मुसळे,गजानन घाडगे, गणेश किरवे, अक्षय,चिवटे,शरद कोकीळ,आनंद निकम,अतुल इंदुरे, गिरीश वाशिंबेकर, कमलेश दळवी,तेजेश बोकण,दिपक सवालके,संदिप ओढणारी,सचिन भणगे,वैभव आहेर,सोनु साडेकर,
आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा