"संत मुक्ताई राज्यस्तरीय काव्य पुरस्कार जाहीर.
उस्मानाबाद, येथील अक्षर मानव व संत मुक्ताई मंदिर, उस्मानाबाद यांच्या वतीने त्या त्या वर्षीच्या सर्वोत्कृष्ट काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार दिला जातो. यावर्षीचा राज्यस्तरीय काव्य पुरस्कार नुकताच नामदेव कोळी यांच्या काळोखाच्या कविता या काव्यसंग्रहाला जाहीर झाला आहे. पुरस्काराचे हे तिसरे वर्ष असून यापूर्वी वर्तमानातील आघाडीचे कवी सन्माननीय संजय चौधरी( कविताच माझी कबर), डॉ. विशाल इंगोले (माझ्या हयातीचा दाखला) यांना हे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. तज्ज्ञ परीक्षकांकडून यथायोग्य परीक्षण करून, अत्यंत पारदर्शकपणे सर्वोत्कृष्ट काव्य संग्रहाची पुरस्कारासाठी निवड केली जाते. मराठी कवितेला अधिकाधिक समृद्ध करण्यासाठी डॉ. रुपेश कुमार जावळे यांच्या संकल्पनेतून आणि श्रीमती मंगलताई वाघ यांच्या साह्याने हा पुरस्कार दिला जात आहे.रोख रक्कम १०,००० रुपये, सन्मानचिन्ह, मानपत्र, पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. अत्यंत अल्पावधीतच साहित्य क्षेत्रामध्ये हा पुरस्कार महत्त्वाचा व मानाचा पुरस्कार म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. येत्या काही दिवसातच पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम संपन्न होईल असे पुरस्कार समितीचे प्रमुख डॉ. रुपेश कुमार जावळे यांनी जाहीर केले आहे.विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा