राष्ट्रीय विश्वगामी माध्यमिक शिक्षक संघाच्या पदाधिकार्यांच्या निवडी
टेंभुर्णी (प्रतिनिधी) :- हॉटेल रत्नाई टेंभुर्णी येथे राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ संचलित राष्ट्रीय विश्वगामी माध्यमिक शिक्षक संघाच्या पदाधिकार्यांच्या निवडी संपन्न झाल्या. ट्विंकल स्टार इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे सहशिक्षक मा.श्री.संदीप विलास साळवे यांची भाजपा युवा मोर्चाचे मा. जिल्हाउपाध्यक्ष सुभाष बापू इंदलकर यांच्या हस्ते जिल्हा सहसंपर्कप्रमुख पदी निवड करण्यात आली.कन्या प्रशाला टेंभुर्णीचे प्राचार्य मा.श्री. सदाशिव रामचंद्र पवार-माढा तालुका सचिव,मा.श्री.नितीन अरुण डोंगरे- मोहोळ तालुका अध्यक्ष,मा.श्री.संजय मुळे-पंढरपूर तालुका अध्यक्ष,मा.श्री. दुर्गनाथ जालिंदर देशमुख-माढा तालुका कार्याध्यक्ष,शुभम सुभाष हवलदार-माढा तालुका सहसचिव व महात्मा फुले विद्यालय टेंभुर्णीचे सहशिक्षक शरद चंद्रकांत सातव सर- माढा तालुका संपर्कप्रमुख निवडी करण्यात आल्या. यावेळी सदाशिव रामचंद्र पवार सर म्हणाले की आपण सर्वांनी एकत्र येऊन शिक्षक बांधवासाठी व पक्षवाढीसाठी मी स्वतःला वाहून घेईन. त्याचबरोबर आपण सर्वांनी मिळून माढा तालुका व संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपण चांगल्या प्रकारे सामाजिक कार्य करू व शिक्षकांच्या अडीअडचणी सोडवू संघटनेचे यावेळी जिल्हा सल्लागार मा श्री दत्तात्रेय ननवरे सर,जिल्हा अध्यक्ष मा श्री बापूसाहेब अडसूळ सर,जिल्हा सचिव जयंत बाळासाहेब माळी सर, जिल्हा संपर्कप्रमुख हरिश्चंद्र गाडेकर सर,चव्हाणवाडी विकास सेवा सोसायटीचे चेअरमन सुभाष बापू इंदलकर,माढा तालुका अध्यक्ष दत्तात्रय देवकते सर,उपाध्यक्ष दिनेश बंडगर सर व नितीन कांबळे सर उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना जयंत माळी सर यांनी केली. सूत्रसंचालन दुर्गनाथ देशमुख सर यांनी केले व आभार हरिश्चंद्र गाडेकर सर यांनी मानले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा