*सुट्टीवर आलेल्या जवानांकडून सख्या चुलत्यास शेतीच्या वादातून स्फोटकाने उडवून जीवे मारण्याची धमकी*
लोहारा तालुक्यातील वडगाव गांजा येथील प्रकार,लोहारा पोलीस स्टेशनकडुन आरोपीस वाचवण्याचा प्रयत्न, तक्रार देऊन एक महिना उलटला तरी अद्याप दखल नाही तुळजापूर: लोहरा तालुक्यातील वडगाव गांजा येथील बालाजी बाबू गिराम वय (४१) या शेतकऱ्यास "माझ्या वडीला विरुद्ध लोहारा येथील कोर्टात वाटणी मागणीचा दावा का दाखल केला, तसेच लोहारा पोलीस स्टेशनमध्ये माझ्या वडीला विरुद्ध तक्रार का दिली म्हणून येथील सोमशंकर दत्तात्रय गिराम यांनी माझ्या सैन्य दलातील स्फोटकाने व शस्ञ हत्याराने "तुझे कुटुंब उद्ध्वस्त करू शकतो", तसेच मी भारतीय सैन्यदलामध्ये असल्यामुळे मला दोन खून माफ अशी धमकी देऊन बालाजी गिराम यांची जमीन अतिक्रमण करून बळकावण्यात आली आहे, याबद्दल सविस्तर वृत्त असे की, येथील बालाजी बाबू गिराम यांच्या नावे असलेली वडगाव शिवारातील गट नंबर ३४/३ व २६/३ सदर जमीन राम गोविंद गिराम यास लिहून दे तसेच आमच्या विरुद्ध वाटणी मागणीचा केलेला दावा कोर्टातून काढून घे म्हणून सतत जीवे मारण्याची धमकी देत असल्यामुळे सदर इसमाविरूध्द अनेक वेळा लोहारा पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी केल्या होत्या परंतु एकदाही लोहारा पोलीस स्टेशनचे कर्मचार्यांनी दखल घेतली नाही, उलट आरोपींना पोलीस प्रशासनाकडून अभय मिळत असल्याचे दिसून येत आहे, तसेच मला व माझ्या कुटुंबास जिवीतास धोका पोलीस प्रशासन जबाबदार राहील असे दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे. सदरील व्यक्तीविरुद्ध कडक कारवाई करून सदर सैनिकाच्या गुंड प्रवृत्तीच्या घटनेची माहिती आपल्या कार्यालयामार्फत संबंधित सैनिक बोर्डाला कळवण्यात यावे व त्याचा बंदोबस्त करण्यात यावा व माझ्या कुटुंबाचे संरक्षण करावे व मला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी बालाजी बाबु गिराम यांच्या कुटुंबा कडून होत आहे.
मी यापूर्वीही अनेक वेळा लोहारा पोलीस स्टेशन मध्ये सदर इसमाविरूध्द तक्रार दाखल केली होती, परंतु एकदाही कडक कारवाई करण्यात आली नाही तसेच मला मी केलेल्या अर्जाची पोहचपावती मला कधीही मिळाली नाही त्यामुळे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून सदरील व्यक्तीविरुद्ध कडक कारवाई करून मला न्याय देण्यात यावा. . बालाजी गिराम शेतकरी वडगाव ( गांजा)
प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
****************2. *************-*
*****************


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा