*उस्मानाबाद जिल्ह्याचे खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर यांचा वाढदिवस काक्रंबा येथे विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा.*
- उस्मानाबाद जिल्हयाचे लोकप्रिय खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत वाढदिवस दरवर्षी प्रमाणे याही वर्षी काक्रंबा येथील शिवसैनिकांनी विविध सामाजिक उपक्रम घेऊन साजरा केला आहे.
उस्मानाबाद शिवसेना जिल्हाप्रमुख तथा उस्मानाबाद कळंब तालुका आमदार कैलास दादा पाटील व शिवसेना तुळजापुर तालुकाप्रमुख जगन्नाथ दाजी गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते..काक्रंबा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या परिसरात शिवसैनिकांच्या वतिने वृक्षारोपन करण्यात आले व शाळेच्या कामासाठी निधी दिली.वृक्षारोपन झाल्यानंतर वाढते प्रदुषन,पर्यावरण,वृक्षलागवड महत्त्व गावकर्यांना सांगण्यात आले.त्याचबरोबर काक्रंबा येथे कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी काक्रंबासह परिसरातील आलेल्या लोकांना शिवसैनिकांच्या वतिने आल्पोहाराची सोय करण्यात आली होती.लस घेतलेल्या प्रत्येकांना अल्पोहार देत कोरोनासंबंधी घ्यावयाची काळजी व प्रशासनास सहकार्य करण्याचे अवहान शिवसैनिकांनी केले.
समाजकार्यातुन शिवसेनेचा वारसा जपत उपस्थित शिवसैनिकांनी ओमराजे निंबाळकर यांना भावी उज्वल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
हे उपक्रम शिवसेना सोशल मीडिया तुळजापुर तालुकाप्रमुख चेतन बंडगर,काक्रंबा गणप्रमुख कालिदास सुरवसे,युवासेना शाखाप्रमुख दिपक भिसे,राष्ट्रवादी सोशल मीडिया समन्वयक रामेश्वर घोगरे,राष्ट्रवादी विद्याथी तालुका संघटक किरण शिंदे, जि.प शिक्षक सुरवसे सर काक्रंबा ग्रामविकास अधिकारी चैतन्य गोरे,काक्रंबा ग्रामपंचायत सदस्य उमेश पांडागळे, अनिल बंडगर,मनोज घोगरे,व चंद्रकांत भिसे,युवराज भिसे,अहमद अन्सारी, संजय सोनटक्के,शिवा सुरवसे,खंडू देवकर यांसह आदि शिवसैनिक व काक्रंबा गामस्थ उपस्थित होते.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा