*तुळजापूर येथे गुरु पौर्णिमा निमित्त तुळजाभवानी गाभाऱ्यात फुलांची सजावट*
तुळजापूर येथील तुळजाभवानीचे मुख्य भोपे पुजारी संभाजीराव शहाजीराव कदम-पाटील, शिवराज कदम-पाटील, व प्रशांत कदम-पाटील यांच्या वतीने,आज दि,२३ जुलै २०२१,रोजी गुरु पौर्णिमेचे औचित्य साधून तुळजाभवानीच्या गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. फुलांच्या सजावटीसाठी पुणे येथून अँथोरियम, कार्नेशन, डच गुलाब, निळी शेवंती, ओर्केट, जरबेरा व ड्रेसेना या जातीची आकर्षक फुले मागवण्यात आल्याची माहिती भोपे पुजारी प्रशांत पाटील यांनी दिली.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा