परंडा येथील डॉ शहाजी चंदनशिवे आउटस्टॅंडिंग प्रोफेसर अवार्ड ने सन्मानित
दि. 22 जुलै 2021 येथील परांडा शहरातील शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ शहाजी चंदनशिवे यांना मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड प्रस्तुत बेस्ट अवार्ड 2021 चा आंतरराष्ट्रीय आऊटस्टॅंडिंग प्रोफेसर अवार्ड नुकताच प्राप्त झाला आहे. त्यांचा श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ उस्मानाबाद आणि शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालयाच्या वतीने आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यामुळे प्राचार्या डॉ दीपा सावळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . यावेळी भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ महेशकुमार माने ,परीक्षा प्रमुख डॉ प्रशांत गायकवाड ,रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ अक्षय घुमरे, प्रा बी डी माने हे सत्कार प्रसंगी उपस्थित होते . डॉ शहाजी चंदनशिवे यांना मिळालेल्या आंतरराष्ट्रीय पुरस्कारामुळे संस्थेचे सचिव तथा डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य संजय निंबाळकर, गुरुवर्य प्राचार्य डॉ अशोक मोहेकर, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे सचिव सुनील चंदनशिवे जलसंधारण विभाग मंत्रालय येथील अवर सचिव अंबादास चंदनशिवे, उस्मानाबाद जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, आमदार सुजितसिंह ठाकूर, परांडा तहसीलचे तहसीलदार अनिल कुमार हेळकर, नगरपरिषद परंडा येथील नगराध्यक्ष जाकीरभाई सौदागर, आमदार ज्ञानेश्वर पाटील, आमदार राहुल मोटे ,खासदार ओमराजे निंबाळकर, बेंडाळे महाविद्यालय जळगाव येथील डॉ जयेंद्र लेकुरवाळे राजश्री शाहू महाविद्यालय लातूर येथील प्राचार्य डॉ महादेव गव्हाणे, डॉ विश्वास शेंबेकर ,डॉ श्रीहरी तलवारे, उपप्राचार्य डॉ सदाशिव शिंदे, प्राध्यापक दत्ता नल्ले, डॉ सिद्धार्थ होवाळ आणि सामाजिक कार्यकर्ते तानाजी शिंदे यांच्यासह महाराष्ट्र राज्यातील सर्व शैक्षणिक ,सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मित्रांनी डॉ शहाजी चंदनशिव यांचे अभिनंदन केले . शैक्षणिक ,सामाजिक व राजकीय क्षेत्रामध्ये डॉ शहाजी चंदनशिवे यांना यापूर्वीही जिल्हास्तरीय पासून आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत अनेक पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे.
प्रतिनिधी रूपेश डोलारे परंडा उस्मानाबाद


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा