Breaking

शुक्रवार, २५ जून, २०२१

*तुळजापूर येथे वटपौर्णिमेनिमित्त गंगने परिवाराच्या वतीने ७०० पितळी पंचपाळे महिलांना भेट*



*तुळजापूर येथे वटपौर्णिमेनिमित्त गंगने परिवाराच्या वतीने ७०० पितळी पंचपाळे महिलांना भेट* 
तुळजापूर शहरात दि.२४ जुन वार गुरुवार रोजी
वटपौर्णिमेनिमित्त नगरपरिषद जुनी कन्या प्रशाला येथील वड पूजनासाठी आलेल्या समस्त महिला माता भगिनींना माजी.नगराध्यक्ष सौ. अर्चनाताई  विनोद गंगणे व सौ.प्रियांका विजय गंगणे,युवा नेते विनोद गंगणे तसेच गंगने परिवाराच्या वतीने तब्बल ७०० पितळी पंचपाळ भेट देण्यात आले.
सावित्रीने यमदेवांकडून आपल्या पतीचे प्राण परत आणले होते. ही घटना ज्येष्ठ पौर्णिमेला घडली. तेव्हापासून पतीच्या प्राणांचे रक्षण व्हावे आणि आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावे, यासाठी सुवासिनी महिला पौर्णिमेच्या दिवशी सावित्रीसारखे व्रत आचरतात. सावित्रीने आपल्या पतीची सेवा वडाच्या झाडाखाली केली. तेथेच यमदेवांनी सत्यवानाला त्याचे आयुष्य परत दिले. त्यामुळे वडाच्या झाडाचे पूजन केले जात होते.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा