Breaking

शुक्रवार, २५ जून, २०२१

तुळजापूर येथे वटपौर्णिमानिमित्त भवती रांगोळी व स्वःता खर्च करून मंडप मारून देतात - नगरसेवक सुनील रोचकरी



तुळजापूर येथे वटपौर्णिमानिमित्त भवती रांगोळी व स्वःता खर्च करून मंडप मारून देतात - नगरसेवक सुनील रोचकरी

पतीच्या प्राणांचे रक्षण व्हावे आणि आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावे, यासाठी सुवासिनी महिला पौर्णिमेच्या दिवशी सावित्रीसारखे व्रत आचरतात. सावित्रीने आपल्या पतीची सेवा वडाच्या झाडाखाली केली. तेथेच यमदेवांनी सत्यवानाला त्याचे आयुष्य परत दिले. त्यामुळे वडाच्या झाडाचे पूजन केले जाते.
यंदाच्या वर्षी गुरुवार, २४ जून रोजी वटपौर्णिमा  वास्तविक पाहता वटसावित्रीचे व्रत तीन दिवसांचे असते. मात्र, ज्यांना तीन दिवसीय व्रत करणे शक्य नाही, त्यांनी वटपौर्णिमेच्या दिवशी हे व्रत विधिपूर्वक आचरावे, असे सांगितले जाते. 
नगरसेवक सुनील रोचकरी यांनी मागील दोन वर्षांपूर्वी पासून प्रभाग क्र. ४ मधील जुनी कन्या प्रशाला येथील वडाच्या झाडा भवती रांगोळी काम करून स्वता करून मंडप मारून देतात तसेच ह्यावर्षी ती  फरशी निकामी झाल्यामुळे वटपौर्णिमा या महिलांच्या पविञ दिनी प्रभागातील  माता भगिनींची गैरसोय होऊ नये म्हणून या वर्षी वडाच्या झाडाला नवीन फरशी स्व:खर्चानी बसवण्यात आली तसेच झाडाजवळील स्वच्छता, मंडप,रांगोळी, कुंड्या  ह्या ठेवण्यात आल्या आहे.
प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा