Breaking

शुक्रवार, २५ जून, २०२१

खाजगी कोचिंग क्लासेस सुरू करण्यात यावे या मागणीसाठी कोचिंग क्लासेस टीचर्स फेडरेशन अँड सोशल फोरम उस्मानाबाद च्या वतीने जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना निवेदन*

*खाजगी कोचिंग क्लासेस सुरू करण्यात यावे या मागणीसाठी कोचिंग क्लासेस टीचर्स फेडरेशन अँड सोशल फोरम उस्मानाबाद च्या वतीने जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना निवेदन*

कोरोना संकटामुळे खाजगी क्लासेस गेल्या 15 महिन्यापासून बंद आहेत.यामुळे खाजगी क्लास संचालक आर्थिकदृष्ट्या डबघाईला आले आहेत.यामुळे खाजगी  क्लासेस तातडीने सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी कोचिंग क्लासेस टीचर्स फेडरेशन अँड सोशल फोरम, उस्मानाबाद च्या वतीने मा.जलसंपदा मंत्री जयंत जी पाटील  साहेब व सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे साहेब व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते  यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी मा. मंत्री महोदयांनी खाजगी क्लास संचालकाच्या अडचणी ऐकून त्यावर मुख्यमंत्री चर्चा करून खासगी क्लासेसला परवानगी देण्याबात   विचार करू असे आश्वासन दिले.  संघटनेच्या वतीने मर्यादित विध्यार्थी संख्येसह  व कोरोनाचे सर्व नियम पाळून खाजगी कलासेस  सुरू  करण्याची परवानगी द्यावी,असे निवेदनात म्हटले आहे.यावेळी कोचिंग क्लासेस टीचरस फेडरेशन ऑफ महाराष्ट्र, उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष अप्पासाहेब सुरवसे व जिल्हा कोषाध्यक्ष तानाजी सोनवणे  सर यांची स्वाक्षरी आहे.

प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा