मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती आरक्षणाबाबत; रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया-आठवले गटाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन....
श्रीगोंदा:नितीन रोही,
राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस (आय) या जातिवादी पक्षांच्या सरकारने प्रशासकीय सेवेतील एससी, एसटी, ओबीसीच्या प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारा निर्णय घेतला असून, मा. खासदार रामदासजी आठवले साहेब (राष्ट्रीय नेते आरपीआय, आठवले गट) यांच्या आदेशान्वये श्रीगोंदा तालुक्यात सुनील साळवे (जिल्हाध्यक्ष आरपीआय आठवले गट) यांच्या सूचनेनुसार राज्य शासनाचा निषेध करीत, लवकरात लवकर मागासवर्गीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय घ्यावा. यासाठी श्रीगोंदा तालुक्यातील RPI (A) च्या पदाधिकाऱ्यांनी श्रीगोंद्याचे तहसीलदार प्रदीप पवार व पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांना त्यांच्या मागण्यांचे निवेदन सादर केले. अन्यथा, नमूद मागण्या पूर्ततेसाठी लवकरच श्रीगोंद्यात तीव्र आंदोलन करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
महाराष्ट्र राज्यामध्ये मागासवर्गीय अधिकारी/कर्मचारी जे प्रशासनात कार्यरत आहेत, यांच्या पदोन्नतीतील आरक्षणाबाबत राज्य शासनाने अन्यायकारक निर्णय घेतला असून, सदर निर्णय राज्य शासनाने त्वरित बदलून प्रशासनातील एससी-एसटी ओबीसींच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत आरक्षण देऊन न्याय द्यावा. अशी न्यायिक मागणी या निवेदनाद्वारे केली आहे.
स्थानिक प्रशासनास निवेदन सादर करतांना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ)चे (जिल्हा उपाध्यक्ष) अविनाश भाऊ घोडके, (श्रीगोंदा शहराध्यक्ष) विशाल घोडके, श्रीकांत दादा घोडके यांचे समवेत दादासाहेब घोडके, पप्पू घोडके, अक्षय घोडके, स्वप्नील घोडके इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो,


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा