Breaking

बुधवार, २ जून, २०२१

वांगदरी च्या रेशनदुकानाची होणार चौकशी-नागवडेश्रीगोंदा-नितीन रोही,


वांगदरी च्या रेशनदुकानाची होणार चौकशी-नागवडे
श्रीगोंदा-नितीन रोही,

 तालुक्यातील वांगदरी येथील रेशन दुकान सेवा सोसायटी च्या वतीने चालवण्यात येते पण या रेशनदुकाना बाबतीत अनेक तक्रारी होत्या या बाबतीत भाजप चे तालुका अध्यक्ष संदीप नागवडे यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी व तहसिलदार श्रीगोंदा यांच्या कडे तक्रार केली होती या तक्रारीत नागवडे यांनी म्हटले होते की,वांगदरी सेवा सोसायटी च्या रेशन दुकानात सर्व सामान्य नागरिकांना त्यांच्या हक्काचे गहू,तांदुळ व इतर धान्य दिले जात नाही व जादा दराने विक्री केली जाते.लाभार्थी यांचे ठसे घेऊन पावती न देता कमी धान्य वाटप केले जाते त्यामुळे नागवडे यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी व तहसिलदार यांच्या कडे तक्रार दाखल केली होती.
त्यानुसार आज तहसीलदार प्रदिप कुमार पवार यांनी या स्वस्त धान्य दुकानाची तात्काळ चौकशी करण्याचा आदेश दिला आहे.त्यामुळे या दुकानाची चौकशी होणार असल्याचे संदीप नागवडे यांनी सांगितले.

चौकट,

गरिबांच्या तोंडचा घास काढून घेणार्यावर कारवाई झाली पाहिजे - नागवडे
या स्वस्त धान्य दुकानातून गोरगरीब जनतेला शासनाच्या नियमानुसार धान्य वाटप केले जात नाही जादा दराने विक्री केली जाते अशा प्रवॄतीवर कारवाई झालीच पाहिजे अन्यथा या रेशन दुकानाला टाळे लावू अशी प्रतिक्रिया संदीप नागवडे यांनी दिली.

चौकट,

वांगदरी च्या रेशनदुकानाची तात्काळ चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत- तहसिलदार पवार
वांगदरी च्या रेशनदुकानाची तक्रार प्राप्त झाली असून नायब तहसीलदार यांना तात्काळ चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत अशी प्रतिक्रिया तहसीलदार पवार यांनी दिली.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा