Breaking

बुधवार, २ जून, २०२१

विठ्ठल चव्हाण यांची पोलीस उप निरीक्षक पदी नियुक्ति...



विठ्ठल चव्हाण यांची पोलीस उप निरीक्षक पदी नियुक्ति...


श्रीगोंदा-प्रतिनिधि,

जामखेड पोलिस ठाण्यात सहाय्यक फौजदार पदी कार्यरत असणारे विठ्ठल चव्हाण यांना पोलीस उपनिरीक्षक पदी बढती मिळाली आहे. जामखेड पोलिस ठाण्यात चव्हाण यांनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे सामान्य माणसांचे प्राधान्याने कामे मार्गी लावण्यासाठी सक्रिय असतात यामुळे वंचित समाजाचे ते आदर्श ठरले आहेत.सविस्तर असे की चव्हाण हे श्रीगोंदा तालुक्यातील बाबूर्डी येथील रहिवाशी आहेत. आणि सध्या जामखेड पोलिस स्टेशनला नेमणूकिस असलेले सहाय्यक फौजदार विठ्ठल बाबुराव चव्हाण यांना सेवाज्येष्ठतेनुसार पोलीस उपनिरीक्षक पदी बढती मिळाली आहे. चव्हाण हे 2014 सालापासून जामखेड पोलिस स्टेशन येथे हेडकॉन्स्टेबल आणि सहाय्यक फौजदार या पदावर कार्यरत होते यापूर्वी 1992 ते 1998 जामखेड पोलिस स्टेशन, सन 1998 ते 2005 पारनेर पोलीस स्टेशन सुपा दूरक्षेत्र सन 2005 ते 2011 कर्जत पोलिस स्टेशन राशीन दूर क्षेत्र 2011 ते 2014 घारगाव पोलीस स्टेशन संगमनेर अशा विविध ठिकाणी चव्हाण यांनी सेवा केली आहे.
 या निवडी बद्दल जामखेड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, हेडकॉन्स्टेबल साठे, कॉन्स्टेबल ढेरे, तसेच महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाळासाहेब नाहाटा,लोकनेते राजेंद्र मस्के,आमदार बबनराव पाचपुते,राष्ट्रवादीचे नेते घनश्याम शेलार, मा.नगराध्यक्ष मनोहर पोटे,उपनगराध्यक्ष रमेश लाढाने,राष्ट्रवादीचे युवा नेते प्रदीप  औटी, बाजार समितीचे सचिव दिलीप डेबरे,प्रहारचे तालुकाध्यक्ष सुरेश सुपेकर,मा.अध्यक्ष नितीन रोही,डॉ. संतोष हिरडे, बाबुर्डीचे सरपंच सुभाष उदमले,मा सरपंच नारायण बोरुडे,मल्हारी शिर्के सर यांच्या सह जामखेड श्रीगोंदा तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच चव्हाण यांना त्यांच्या बंधूंचे वडिलांचे आशीर्वाद लाभत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा