Breaking

बुधवार, २ जून, २०२१

शिवराज्यभिषेक दिनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळयाचे भूमिपूजन, नगराध्यक्ष सचिन भैय्या रोचकरी*




*शिवराज्यभिषेक दिनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळयाचे भूमिपूजन, नगराध्यक्ष सचिन भैय्या रोचकरी*

तुळजापूर विकास प्राधिकरण अंतर्गत तुळजापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळयासह चौक सुशोभीकरणाच्या कामाचे भूमिपूजन दि. ०६/०६/२०२१ रोजी शिवराज्यभिषेक दिनी आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या शुभ हस्ते आयोजित करण्यात आले आहे.
            छत्रपती शिवाजी महाराजाच्या अश्वारुढ पुतळयासह चौक सुशोभीकरण कामाच्या मूळ प्रस्तावा मध्ये अनेक बाबी व सुधारणा अंतर्भूत केल्या आहेत. मुळ प्रस्तावात केवळ पुतळ्याचे स्थलांतर होते. यामध्ये नवीन संकल्पना मांडत आ. राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी अनेक बदल सुचविले व चौकाचे सुशोभीकरण देखील समाविष्ट केले. यामुळे किमतीत वाढ झाल्याने सदरील प्रस्ताव शासनाच्या मान्यतेसाठी पाठविणे आवश्यक होते. या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांना सूचना देवून प्रस्ताव तातडीने नगरविकास विभागा कडे पाठविण्यात आला होता. या विभागाचे सचिव श्री.महेश पाठक यांच्याशी पाठपुरावा करून याची मंजूरी मिळवून घेतली. कोविड-१९ निर्बंधामुळे तुळजापूर विकास प्राधिकरणाची बैठक घेणे शक्य नसल्याने आ. राणाजगजितसिंह पाटील साहेब यांच्या सुचणे प्रमाणे सर्कुलेटेड ठराव घेवून यास प्रशासकीय मान्यता घेण्यात आली असून कार्यारंभ आदेश निर्गमित करण्यात आला आहे.तसेच सदरील पुतळा सुशोभिकरण कामाच्या अनुशंगाने नगराध्यक्ष सचिन रोचकरी,युवा नेते विनोद (पिटु) गंगणे,सर्व नगरसेवकांनीही पाठपुरावा केला होता.
      सदरील कामाचे कंत्राट एम आर काँन्स्टुकॅश,अहमदनगर यांना मिळाले असून युद्ध पातळीवर काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या पावन नगरीला साजेसा महाराजांचा पुतळा उभारण्यात येणार असून या चौकाचे सुशोभीकरण देखील करण्यात येणार आहे. शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून कोविड नियमांचे पालन करत या कामाचा भूमिपूजन कार्यक्रम आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या शुभ हस्ते दि. ०६/०६/२०२१ रोजी आयोजित करण्यात येणार आहे. 

प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा