*
*लहू ता.माढा ग्रामस्थांच्या वतीने आंदोलनकर्त्यांचे सत्कार*
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.श्री दत्तात्रय भरणे मामा यांनी इंदापूर तालुक्याच्या 22 गावांसाठी पाच टीएमसी पाणी मनमानी कारभार करून मंजूर केले होते उजनी जलाशयाच्या शंभर टक्के पाण्याचे वाटप झालेले असताना सांड पाण्याच्या नावाखाली महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा.श्री अजित पवार साहेब यांनी मंजूर केले होते सांडपाण्याच्या नावाखाली केलेलं वरील मंजूर पाणी हे पाणी उजनी जलाशयातून सांडपाणी येत नसताना सुद्धा ते कशाच्या आधारावर मंजूर केले हेही कोणालाही काहीच माहिती नव्हते व सोलापूर जिल्ह्याच्या खासदार किंवा विद्यमान आमदार कोणत्याही प्रतिनिधीला विश्वासात घेण्यात आले नाही सोलापूर जिल्ह्यातल्या सर्व शेतकरी संघटनेच्या माध्यमातून लढा देऊन निर्णय रद्द करण्यास भाग पाडले या यशस्वी आंदोलनाबद्दल *संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप,करमाळा संपर्कप्रमुख गणेश शिंदे, ता.उपाध्यक्ष अविनाश पाटील,अकुलगाव शाखाध्यक्ष जयसिंग जगताप यांचा लहू ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आले*
*यावेळी उपसरपंच विकास पाटील,ग्रां.प.सदस्य सतीश चव्हाण,आप्पा (वस्ताद) लुंगसे सचिन चव्हाण,अण्णासाहेब लुंगसे,शरद घोडके व लव्हे गावचे सर्व ग्रामस्थ व ग्रामसेवक सुतार भाऊसाहेब उपस्थित होते*


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा