*आशा बहुउददेशीय सेवाभावी संस्था तामलवाडी चा कोरोना पिडीतांना मदतीचा हात*
कोरोनामुळे उपचारासाठी तुळजापूर येथील उप रुग्णालयात लॉकडाऊन कालावधीमध्ये दाखल झालेल्या रुग्णांची व त्याच्या नातलगांची तसेच भल्या पहाटे लसीकरण करण्याकरिता आलेल्या सर्व नागरिकांना व महिलांना गैरसोय होऊ नये यासाठी आशा बहुउददेशीय सेवाभावी संस्था तामलवाडी चे संस्थापक अध्यक्ष श्री शिवाजी रामकृष्ण सावंत (माजी सैनिक) च्या वतीने कोविड सेंटर मध्ये जाऊन सकाळच्या नाष्टयाची व मास्क वाटपाची सोय करण्यात आली होती व उपचार करतेवेळी कोणास काहीं अडचण येत आहे याबाबत विचारपूस करण्यात आली त्याप्रसंगी शिवाजी रामकृष्ण सावंत, सतीश लोंढे, बबलू राऊत, सूरज राऊत व शंकर बब्रूवान कदम उपस्थित होते.
प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा