Breaking

बुधवार, २ जून, २०२१

शेतकऱ्यांना येणाऱ्या संभाव्य समस्यांच्या निवारणासाठी स्वाभिमानीची कृती समिती*


*शेतकऱ्यांना येणाऱ्या संभाव्य समस्यांच्या निवारणासाठी स्वाभिमानीची कृती समिती*
*करमाळा तालुका प्रतिनिधी- अतुल वारे पाटील*
स्वाभिमानी शेतकरी संघटना करमाळा तालुका पदाधिकाऱ्यांची नुकतीच बैठक  संपन्न झाली.यात
खरीप हंगाम 2021 मध्ये शेतकऱ्यांना विविध संभाव्य समस्या बाबत समस्या निवारण कृती आराखडा तयार करण्यात आला.
 खतांच्या वाढीव किमतीबाबत दोन दिवसात कृषी विभागाला निवेदन देणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष सुदर्शन  शेळके यांनी दिली. तसेच
पिक कर्ज,पिक विमा, बी बियाणे,
खते,कीटकनाशके, औषधांबाबत काही तक्रारी असल्यास किंवा तालुक्यातील कुठल्याही कृषी सेवा केंद्रावर निकृष्ट अथवा बोगस बियाणे खते औषधे विक्री होत असल्यास तसेच पीक कर्ज देण्यास बँक त्रास देत असल्यास 24 तास सेवेत उपलब्ध असलेल्या खालील भ्रमणध्वनी वरती शेतकऱ्यांनी संपर्क साधावा असे आवाहन सुदर्शन शेळके यांनी केले आहे 
संपर्क...........
जि.कार्यध्यक्ष रविंद्र गोडगे
9881421404,ताअध्यक्ष
सुदर्शन शेळके
9404651639,ता.युवा अध्यक्ष आमोल घुमरे
9763409701,ता.पक्षाध्यक्ष बापू फरतडे 9096926445,
ता.उपाध्यक्ष तानाजी शिंदे
9975347171.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा