: *कुर्डुवाडी ग्रामीण रुग्णालयातील ट्रामा केअर सेंटरची सुमारे पाच कोटी रुपयांची निविदा निघाल्याने सर्वत्र आनंद...*
*आमदार बंधूद्वय बबनदादा व संजयमामा शिंदेंच्या पाठपुराव्याला यश...*
*"ट्रामा केअर युनिट"... चालू वर्षी मार्गी लागणार... वैद्यकीय क्षेत्रातील माईलस्टोन ठरणार...*
*✒️कुर्डुवाडी विशेष बुलेटिन✒️*
*अरुण कोरे(पत्रकार)यांजकडून...*
*गेल्या दोन वर्षांपासून कुर्डुवाडीत प्रलंबित "ट्रामा केअर सेंटर"चा प्रश्न अखेरीस मार्गी लागला असून आमदार बंधूद्वय बबनदादा व संजयमामा शिंदेंच्या पाठपुराव्याला अखेरीस यश आल्याने परिसरातील चार पाच तालुक्यांनाही त्याचा फायदा होणार असल्याने सर्वत्र आनंद व्यक्त केला जात आहे.*
*कुर्डुवाडीत ट्रामा केअर सेंटर सुरू करण्यासाठी दोन वर्षांपासून प्रयत्न सुरू होते.तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ.शशीकांत त्रिंबके(सध्या फलटण) यांनी कुर्डुवाडीत ट्रामा केअर सेंटरची आवश्यकता निदर्शनास आणली होती. कुर्डुवाडी विशेष बुलेटिनच्या माध्यमातूनही वेळोवेळी आवाज उठऊन पाठपुरावा करण्यात आला होता.*
*कुर्डुवाडी येथून अन्यत्र ट्रामा केअर सेंटर पळवण्याचाही प्रयत्न झाला होता.आमदार द्वयांच्या पाठपुराव्यामुळे व प्रयत्नाने गेल्या वर्षीच्या बजेटच्या अगोदर त्यास मंजूरी मिळाली होती.*
*परंतु त्यावेळी आर्थिक तरतूद झाली नव्हती.गेल्या बजेटमध्ये आमदार बंधूद्वय बबनदादा व संजयमामा शिंदेंनी अडचणी असतानाही मोठ्या खुबीने बजेटमध्ये शासनाकडून आर्थिक तरतूद करुन घेतली होती.त्यानुसार त्याचा पाठपुरावाही सुरू होता.*
*अखेरीस काल कुर्डुवाडी ग्रामीण रुग्णालयात ट्रामा केअर सेंटरची इमारत उभी करण्यासाठी पहिली निविदा सार्वजनिक बांधकाम खात्याकडून काढण्यात आल्याने बांधकामास लवकरच सुरुवात केली जाईल.*
*एकूण ४,७७,९७,९५७/-( चार कोटी सत्त्याहत्तर लाख सत्त्याण्णव हजार नऊशे सत्तावन्न) रुपयांची निविदा सां.बां.२/निविदा/१३०७/२१दि.२८-५-२१अन्वये ट्रामा केअर सेंटरच्या इमारत बांधकामासाठी जाहीर प्रसिद्धीकरण करण्यात आले आहे.*
*कुर्डुवाडीतील या ट्रामा सेंटरमुळे माढा,करमाळा,मोहोळ, बार्शी,परांडा,भूम व पंढरपूर व माळशिरसच्या माढा तालुक्याच्या हद्दीवरील गावातील रुग्णांना त्याचा फार मोठा फायदा होणार आहे.*
*या नव्याने उभारण्यात येणा-या ट्रामा केअर सेंटरची सुमारे सोळा हजार स्क्वेअर फूटावर दुमजली इमारत असणार अाहे.याव्यतिरिक्त अत्याधुनिक मशिनरी व सर्व सुविधांनी युक्त असे महारुग्णालय उभे रहाणार आहे.*
*या रुग्णालयात दहा ते बारा डॉक्टर्स,कर्मचारी वर्ग आदी मोठा स्टाफ असणार आहे.या सेंटरमध्ये अपघातग्रस्त रुग्णांना विशेष सेवा पुरविण्यात येणार असल्याने त्याच्या उभारणीनंतर इमर्जन्सी रुग्णांना बार्शी,सोलापूर,पुणे आदी ठिकाणी जावे लागणार नाही.वेळेचा व पैशाची बचत होऊन रुग्णांची होणारी मोठी जीवीतहानी टळणार आहे.*
*आमदार बंधूद्वय बबनदादा व संजयमामा शिंदेंना संपर्क साधला असता कुर्डुवाडी हे महत्त्वाचे जंक्शन असून नव्याने उभारण्यात येणा-या ट्रामा केअर सेंटरमध्ये सर्व सुविधांनी युक्त उभारणी करण्यात येणार असून ग्रामीण भागातील रुग्णांची कोणतीही हेळसांड होणार नाही यासाठी सर्व उपाययोजना युध्दपातळीवर करण्यात येतील असे सांगण्यात आले.त्यामुळे रुग्णांच्या वेळेची व पैशाची बचत होऊन रुग्णांची होणारी जीवितहानी टळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.*
*कुर्डुवाडी ट्रामा केअर सेंटरच्या माध्यमातून कुर्डुवाडी शहरातील वैद्यकीय क्षेत्रातील माईलस्टोन ठरुन मोठी पोकळी भरून निघणार असल्याने नागरिकांमध्ये स्वागत व आनंद व्यक्त केला जात आहे.*


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा