Breaking

शुक्रवार, ४ जून, २०२१

स्व .गोपीनाथजी मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त पत्रकारांना सॅनिटायझर व मास्क वाटप*



*स्व .गोपीनाथजी मुंडे  यांच्या पुण्यतिथीनिमित्त पत्रकारांना सॅनिटायझर व मास्क वाटप*


*करमाळा तालुका प्रतिनिधी- अतुल वारे पाटील*
 

      भारतीय जनता पार्टी करमाळा तालुक्याच्या वतीने 
स्व, गोपीनाथजी मुंडे  यांची पुण्यतिथी निमीत्त भाजपा संपर्क कार्यालय गायकवाड चौक करमाळा येथे दिनांक 03/06/21 बुधवारी अभिवादन करण्यात आले. यावेळी पत्रकारांना मास्क व सॅनिटायझर चे वाटप करण्यात आले.
     यावेळी विस्तारक अॅड भगवानगिरी गोसावी  यांच्या हस्ते मुंडे साहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन  करण्यात आले. 
सदर प्रसंगी प्रवीण बिनवडे ,किरण बोकण , संजय घोरपडे,  बाळासाहेब कुंभार यांनी आपली मनोगते व्यक्त केली ,
समारोप प्रसंगी तालुका अध्यक्ष गणेश चिवटे यांनी श्रद्धेय मुंडे साहेबांचा जीवनपट सर्व कार्यकर्त्यांना  सांगितला व त्यांनी पार्टीसाठी दिलेले योगदान त्यांची विचार व आचार प्रणाली कार्यकर्त्यांनी आत्मसात करून भावी काळात तालुक्यात पार्टीचा विस्तार करणे कामी स्वतःला झोकून देऊन काम करावे व तळागाळापर्यंत भाजपा न्यावा असे आवाहन केले.प्रत्येक कार्यकर्त्यांनी मुंडे साहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन काम केले तर नक्कीच तो कार्यकर्ता मोठा झाल्याशिवाय राहणार नाही व पर्यायाने पार्टी मोठी होईल हाच संकल्प या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने सर्वांनी करावा अशी कळकळीची विनंती केली. 
पुण्यतिथी निमित्त सर्व पत्रकार बांधवांना तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांचे हस्ते  सॅनिटायझर व मास्क चे वाटप  करण्यात आले, यावेळी पत्रकार सुहास घोलप , नासीर कबीर,  अतुल वारे पाटील,जयंत दळवी ,संजय शिंदे, सचिन जव्हेरी, आशपाक सय्यद, संजय कुलकर्णी ,अशोक नरसाळे, दिनेश मडके ,नितीन घोडेगावकर, अतुल बोकण , 
तालुका सरचिटणीस काकासाहेब सरडे ,तालुका उपाध्यक्ष मच्छिंद्र हाके ,उद्योग आघाडी तालुकाध्यक्ष बाळासाहेब होसिंग, किसान मोर्चा तालुका अध्यक्ष विजयकुमार नागवडे, तालुका प्रसिद्धीप्रमुख जयंत काळे पाटील, तालुका चिटणीस आजिनाथ सुरवसे, अशोक ढेरे ,विनोद महानवर,
युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष हर्षद गाडे, मनोज मुसळे ,ओबीसी तालुका सरचिटणीस भैयाराजे गोसावी, वसीम सय्यद ,बबलू दुधाट उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा