Breaking

रविवार, ६ जून, २०२१

बोगस बियाणे विक्री करणाऱ्याचे परवाने रद्द करा.. संजीवकुमार गायकवाड*



*बोगस बियाणे विक्री करणाऱ्याचे परवाने रद्द करा.. संजीवकुमार गायकवाड*
नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट

*नांदेड*:दि.4. जून जिल्यात 
  खते,बी-बियाणे,औषधींचा बोगस पुरवठा करणारे  फार मोठे रॅकेट आहे.बोगस बियाणे विक्री करुन शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांचे परवाने नूतनीकरण कृषी खात्याने थांबवावे,अशी मागणी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ नांदेड जिल्हाध्यक्ष संजीवकुमार गायकवाड यांनी जिल्हाधिकारी, व जिल्हाकृषि अधिकारी नांदेड, यांच्या कडे केली  आहे.   

याबाबत 
बोगस खते,बी-बियाणे,औषधी पुरवठा करणाऱ्या कंपन्यांची साखळी कार्यरत आहे.याबाबत अनेक तक्रारी शासनाकडे यासंदर्भात विविध समित्या चौकशीसाठी नेमलेल्या आहेत.परंतु कृषी विभागाकडून कारवाई ची मागणी करण्यात आली आहे.गेल्या वर्षी काही कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या माथी बोगस बियाणे मारली होती त्यामुळे कोरोना काळात या कंपन्या मुळे फार मोठे नुकसान झाले होते त्याची भरपाई अजूनही झाली नाही. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघांचे नांदेड जिल्हाध्यक्ष श्री. संजीवकुमार गायकवाड यांनी केला आहे.

 उत्पादक व विपणन कंपन्यांना महाराष्ट्रात विक्री करण्याचे परवाने कसे काय दिले जातात? बियाणे कायदा,अधिनियमाचे उल्लंघन केले जात आहे.त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होते. दुबार पेरणीसारखे संकट शेतकऱ्यांवर येते.त्यामुळे नुकसान होऊन शेतकरी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करतात.त्यामुळे सरकारने अशा बोगस बियाणे विक्री करणाऱ्याचे  तातडीने परवाने रद्द करावेत, अशी एक निवेदनातं नांदेड जिल्हाधिकारी नांदेड व जिल्हा कृषि अधिकारी नांदेड यांना अशी मागणी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा