Breaking

रविवार, ६ जून, २०२१

तुळजापूर येथे यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा*


*तुळजापूर येथे यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा*
तुळजापूर - येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात 6 जून "शिवस्वराज्य दिन"उत्साहात साजरा करण्यात आला. या दिवशी महाविद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या वेळी महाविद्यालयात प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक प्रतिमेचे पूजन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.नरसिंग जाधव सिनेट सदस्य प्रा.संभाजी भोसले,प्रो. डॉ. गोविंद काळे,सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डॉ. शिवाजी जेटीथोर यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार  ,पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.या वेळी उपस्थित सर्वांनी प्रतिमेस पुष्प अर्पण केले आणि अभिवादन केले.
या वेळी महाविद्यालयातील प्रा. डॉ. श्रीरंग लोखंडे, प्रा.डॉ.ब्रहस्पती वाघमारे,प्रा. डॉ. कार्तिक पोळ ,प्रा.सत्यवान मुसळे, प्रा. रामलिंग थोरात, प्रा. कुमार खेंदाड ,प्रा. आमोद जोशी, श्री.शाहूराज घोडके,श्री.हणमंत भुजबळ, श्री.मुळे,श्री. महादेव जाधव तसेच  प्राध्यापक,शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी  उपस्थित होते.

प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा