*माढा तालुक्याला कायदा व सुव्यवस्था बाबतीतही दुय्यम दर्जा पोलीस निरीक्षकांच्या जागेवर सहाय्यक पोलीस निरीक्षकांची नेमणूक*
AJ 24 Taas News Maharashtra
टेंभुर्णी प्रतिनिधी/सध्या सोलापूर जिल्हा त्यातल्या माढा तालुका अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या व उजनी धरणातील पाणी पळवणे याबाबतीत महाराष्ट्रात गाजत असून कायदा व सुव्यवस्था बाबतीतही महाराष्ट्र शासनाकडून माढा तालुक्याला दुय्यम दर्जाची वागणूक मिळत असल्याची सध्या चर्चा तालुक्यातून होत आहे.
टेंभुर्णी ,कुर्डूवाडी व माढा अशी तीन प्रमुख पोलीस स्टेशन असलेले माढा तालुका परंतु लोकसंख्या व गुन्हेगारीच्या बाबतीत चर्चेत असलेल्या कुर्डूवाडी पोलीस स्टेशनचा पदभार सहाय्यक पोलीस निरीक्षक चिमनाजी केंद्रे यांच्याकडे सोपवला असून मराठवाड्याचे प्रवेशद्वार सोलापूर-पुणे हायवे वरील माढा तालुक्यातील टेंभुर्णी पोलीस स्टेशन म्हणून चर्चेत असलेल्या पोलीस स्टेशनचा करमाळ्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांना देऊन माढा तालुक्यात कायदा व सुव्यवस्था पोलीस प्रशासन दक्ष नसल्याचे दिसून येत आहे.गेल्या काही दिवसापासून टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे वादात सापडले असून दलित संघटनांनी त्यांच्या विरोधात अमानवी कृत्य केल्याचे आरोप करत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. वास्तविक पाहता त्यांचा तात्पुरता पदभार हा एखाद्या पोलीस निरीक्षकाला देणे गरजेचे असताना सुद्धा त्यांच्या जागी साहाय्यक पोलीस निरीक्षकाला पदभार देऊन या ठिकाणी आणखीनच गोंधळ व जनतेमध्ये संभ्रम करण्याचा प्रयत्न पोलिस प्रशासनाकडून होताना दिसून येत आहे, वास्तविक पाहता टेंभुर्णी पोलीस स्टेशनला पूर्वीचे नियुक्त दोन सहाय्यक पोलिस निरीक्षक अमित शितोळे व सुशील भोसले असताना त्यांनी काही दिवस या पोलिस स्टेशनला काम केले असल्याने त्यांना या भागाची या भागातील गुन्हेगारी क्षेत्राची जाण असल्याने खरे तर त्यांच्याकडे पदभार देणे अपेक्षित असताना बाहेरून दोन ठिकाणचा पदभार असणारा व या भागाशी असणारा सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांच्याकडे टेंभुर्णी पोलीस स्टेशनचा पदभार दिल्याने यामध्ये काही गौडबंगाल तर नाही ना? अशी चर्चा माढा तालुक्यात होत आहे तसे पाहिले तर पोलीस मुख्यालया पुढे चार ते पाच पोलीस निरीक्षक अतिरिक्त असताना त्यापैकी एखाद्याला टेंभुर्णी पदभार देणे अपेक्षित होते परंतु तसे न घडल्याने माढा तालुक्यातील सर्व पोलीस स्टेशनचा कारभार दुय्यम दर्जाच्या अधिकाऱ्याकडे देऊन कायदा व सुव्यवस्था रामभरोसे चालल्याची चर्चा सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा