*सोलापूर दुहेरी पाइपलाइनच्या भूसंपादन तिसऱ्यांदा फेर सर्वे करता वेळेस शेतकऱ्याची उद्धट वागणाऱ्या अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करा... मा. उपसभापती तुकाराम ढवळे*
टेंभुर्णी (प्रतिनिधी) माढा तालुक्यातील सोलापूर दुहेरी पाणीपुरवठा योजना पाईपलाईन साठी भूसंपादनासाठी तिसऱ्यांदा फेर सर्वे शेतकऱ्यांना दमदाटी करून करणाऱ्या माढा तशिलदार राजेश चव्हाण सह उपजिल्हाधिकारी नागेश पाटील त्यांच्यावर शेतकऱ्यांना अरेरावीची भाषा करून दमदाटी केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्याची मागणी माढा तालुक्याचे माजी उप सभापती तुकाराम ढवळे सह 100 शेतकऱ्यांनी न्याय मागण्यासाठी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात धाव घेऊन एक तास त्यांच्यावर ती कारवाई करा अशा मागणी केली.
यावेळी पत्रकारांना बोलताना ढवळे म्हणाले की सध्याच्या भूसंपादनासाठी ची प्रक्रिया अतिशय अन्यायकारक असून यात शेतकर्यांचा कोणताही विचार केला जात नाही ही एक प्रकारची मोगलाई असून अधिकारी अफजलखाना सारखे वागत आहेत 3 वेळा भूसंपादन 3 वेळा सर्व झाला आता कितीही वेळा न सांगता व्हेरिफिकेशन दमबाजी करीत केले जात आहे अशा मुजोर अधिकारी नागेश पाटील यांचे वर गुन्हा दाखल करण्याची मागणी सापटणे, वेनेगाव येथील शेतकऱ्यांनी केली आहे.
सविस्तर वृत्तांत असा की सोलापूर पाणीपुरवठा योजना पाईप लाईन साठी भूसंपादनासाठी फेरसर्वे कारणासाठी तीव्र विरोध केला होता परंतु शासनाचे पुढे शेतकर्यांचे काही चालले नाही फेरसर्वे झाला आता शेतकर्यांना न सांगता अचानक भूसंपादन अधिकारी नागेश पाटील यांनी व्हेरिफिकेशन चालू केले त्या वेळेस शेतकर्यांनीच हे व्हेरिफिकेशन तात्काळ थांबवा व कुठचीही पूर्वसूचना न देता जबरदस्तीने दमबाजी करीत व्हेरिफिकेशन चालू केले म्हणून संबंधित भूसंपादन अधिकारी यांचे वर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करीत संबंधित शेतकरी यांनी पोलीस स्टेशन मध्ये धाव घेतली त्यावेळी मात्र ही जमीन आता शेतकर्यांची राहिली नाही त्यामुळे मी कितीही वेळा व्हेरिफिकेशन करणार आहे असे संबंधित भूसंपादन अधिकारी नागेश पाटील यांनी उद्धट भाषेत सांगितले या वेळी शेतकरी व अधिकारी यांच्यात खडाजंगी उडाली परंतु टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पीटीआय शितोळे व एपीआय भोसले यांनी मध्यस्ती केल्याने शांतता कायम राहिली यावेळी शेतकरी तुम्ही किती वेळा सर्वे करणार व्हेरीफिकेशन करणार जर जमीनच तुमचे आहे तर आम्हाला कशाला बोलता व सर्वे चे नाटक तरी का अशा व्यथा व्यक्त करीत होती तर भूसंपादन अधिकारी नागेश पाटील यांनी पत्रकार यांच्याशी बोलताना सांगितले की "मी व्हेरीफिकेशन करणारच असून सदर जमीन शासन यांची झाली आहे एक महिन्याचे आत आम्ही मोबदला जाहीर करू असे सांगितले" व्हेरिफिकेशन चालू असुन त्यास शेतकर्यांचा विरोध आहे या बाबत ची संपूर्ण हकिगत अशी की सोलापूर पाणीपुरवठा योजने साठी साधारणपणे 10 ते 12 महिन्यापूर्वी ज्या भागातून पाणीपुरवठा पाईप लाईन जाणार आहे अशा भागाचा सर्वे करण्यात आला होता तसेच महत्त्वाची गोष्ट म्हणजे नुकसान भरपाई ची पाहणी करून सर्वे सरकारी अधिकारी यांनी पूर्ण केला.व माढा तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई बाबत आश्वथ करण्यात आले अणि फक्त माढा तालुक्यात जास्त भरपाई द्यावी लागत आहे त्या मुळे फेर सर्वे चे आदेश तब्बल 10 महिने नंतर देण्यात आले आहेत.
दरम्यानच्या काळात सर्वे झाला आहे असे समजून संबंधित शेतकरी यांनी नुकसानभरपाई मिळेल म्हणून सदर फळझाडे, पिके या कडे दुर्लक्ष केले तसेच अतिवृष्टीमुळे मुळे ही काही ठिकाण पिके तसेच फळझाडे यांचे नुकसान झाले होते परंतु आपणास भरपाई मिळणार आहे अशा असे वाटून शेतकरी बिनधास्त राहिले परंतु . या आधीही बहुतांश याच शेतकर्यांचा शेतातून सोलापूर जुनी पाणीपुरवठा योजना पाईप लाईन, NTPC पाईप लाईन, या योजना साठी भूसंपाद झाले आहे. जुन्या पाईप लाईन ची कसलीही नुकसान भरपाई मिळाली नाही या उलट हायवे बाजूने ती पाईप लाईन झाल्या मुळे बर्याच ठिकाणी रस्त्याचा प्रश्न तयार झाला तर जमिनीचे बाजार मुल्य ही कमी झाले आहे. यावेळी
सापटणे वेणेगाव येथील शेतकरी अमोल ढवळे.समाधान ढवळे.गितीन ढवळे.सुनिल ढवळे.नागनाथ ढवळे.जगन्नाथ ढवळे.देविदास ढवळे.श्रीराम ढवळे.अनिल ढवळे.इत्यादी. उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा