Breaking

शुक्रवार, ४ जून, २०२१

मुख्याध्यापक हनुमंत कदम यांचा सेवानिवृत्तीनिमित्त संस्थेच्या वतीने सत्कारसंस्थेच्या विकासासाठी कदम यांनी 25 हजारांची देणगी दिली


मुख्याध्यापक हनुमंत कदम यांचा सेवानिवृत्तीनिमित्त संस्थेच्या वतीने सत्कार
संस्थेच्या विकासासाठी कदम यांनी 25 हजारांची देणगी दिली

माढा / प्रतिनिधी-  माढा तालुक्यातील विठ्ठलवाडीचे रहिवासी व रत्नागिरी जिल्ह्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या बळीराम परकर विद्यालय व मुरारी तथा भाई मयेकर जुनियर कॉलेजचे मुख्याध्यापक हनुमंत नरसिंह कदम यांचा सेवानिवृत्तीबद्दल संस्थेच्या वतीने चेअरमन सुनील मयेकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह,भेटवस्तू,शाल,श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.

मुख्याध्यापक हनुमंत कदम यांनी संस्थेच्या विविध शाखांमध्ये 32 वर्षे अर्थशास्त्र,समाजशास्त्र व मराठी या विषयाचे उत्कृष्टरित्या अध्यापन केले याची दखल घेत त्यांचा संस्थेच्या वतीने वेळोवेळी सन्मान झाला.एक
विद्यार्थीप्रिय हाडाचे शिक्षक म्हणून त्यांची ओळख आहे.विशेष बाब म्हणजे त्यांना मोहिनी मुरारी मयेकर शिक्षण संस्थेत संचालक म्हणून काम करण्याची संधीही मिळाली.याप्रसंगी हनुमंत कदम यांनी संस्थेच्या विकासासाठी 25 हजार रुपयांची देणगी चेअरमन सुनील मयेकर यांच्याकडे सुपूर्द केली.

याप्रसंगी बोलताना अनेक मान्यवरांनी मुख्याध्यापक हनुमंत कदम यांच्या शैक्षणिक व सामाजिक आणि सांस्कृतिक कार्याचे तोंडभरून कौतुक केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

सत्काराला उत्तर देताना हनुमंत कदम म्हणाले की,अनेक अष्टपैलू, सर्वगुणसंपन्न,गुणी,होतकरु आणि स्वावलंबी विद्यार्थी घडविले त्याचा सार्थ अभिमान आहे.उर्वरित आयुष्यात समाजसेवा करण्याचा मानस असून कुटुंबातील सदस्य,नातेवाईक व मित्रमंडळी यांना यथाशक्ती सहकार्य व मार्गदर्शन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी स़स्थेचे पदाधिकारी,सदस्य, विविध शाखेचे मुख्याध्यापक व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

फोटो ओळी - विठ्ठलवाडी ता.माढा येथील मुख्याध्यापक हनुमंत कदम यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करताना चेअरमन सुनील मयेकर व इतर मान्यवर.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा