रामचंद्र भांगे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माढा तालुका उपाध्यक्षपदी निवड
विठ्ठलवाडीतील कार्यकर्त्यास तालुका पातळीवर काम करण्याची प्रथमच संधी
टेंभूर्णी /प्रतिनिधी -माढा तालुक्यातील विठ्ठलवाडी ग्रामपंचायतीचे कर्तव्यदक्ष विद्यमान सदस्य,श्री विठ्ठल सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष, विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे संचालक,जिल्हा परिषदेचा आदर्श गोपालक पुरस्कार प्राप्त व प्रगतशील द्राक्ष बागायतदार रामचंद्र विठ्ठल भांगे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माढा तालुका उपाध्यक्षपदी निवड झाल्याचे पत्र माढा विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष रमेश पाटील व कार्याध्यक्ष रामभाऊ शिंदे यांच्या हस्ते टेंभुर्णी येथे देण्यात आले असून यानिमित्ताने विठ्ठलवाडीतील कार्यकर्त्यास तालुका पातळीवर काम करण्याची प्रथमच संधी मिळाली आहे.
निवडीनंतर नूतन तालुका उपाध्यक्ष रामचंद्र भांगे यांनी सांगितले की, माढा विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबनराव शिंदे, आमदार संजयमामा शिंदे व जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे व विविध योजना आणि कामे तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.या पदाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनता व गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
निवडीनंतर नूतन उपाध्यक्ष रामचंद्र भांगे यांचा विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महेंद्र कदम व प्रा.डॉ.नेताजी कोकाटे यांनी ग्रंथ भेट देऊन यथोचित सत्कार करुन अभिनंदन केले आणि पुढील सामाजिक,सांस्कृतिक व राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी कार्यालयीन अधीक्षक विजय उपासे,रमेश ढावरे उपस्थित होते.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष दिलिप भोसले, माजी सरपंच शिवाजी पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे तालुकाध्यक्ष संभाजी पाटील,पत्रकार अनिल जगताप, पतसंस्थेचे उपाध्यक्ष नारायण खांडेकर,वाचनालयाचे सचिव नेताजी उबाळे,संचालक नेताजी कदम, पत्रकार राजेंद्र गुंड सर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
फोटो ओळी - विठ्ठलवाडी ता.माढा येथील रामचंद्र भांगे यांना निवडीचे पत्र देताना अध्यक्ष रमेश पाटील, रामभाऊ शिंदे व इतर मान्यवर


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा