Breaking

शुक्रवार, २५ जून, २०२१

मातोश्रींच्या पुण्यस्मरणानिमित्त पोथरे येथे वटवृक्षाचे रोपण*


*मातोश्रींच्या पुण्यस्मरणानिमित्त पोथरे येथे वटवृक्षाचे रोपण*


*करमाळा तालुका प्रतिनिधी- अतुल वारे पाटील*
    वटपौर्णिमेचे औचित्य साधत पोथरे येथे स्मृतिशेष भीमाबाई आनंदा झिंजाडे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त परिसरात वटवृक्षाचे रोपण करत महिलांनी या वटवृक्षच्या रोपांची विधिवत पूजा करत एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
          या अनोख्या उपक्रमाबद्दल बोलताना माजी सरपंच तसेच स्मृतिशेष भिमाबाईंचे सुपुत्र हरिश्चंद्र झिंजाडे म्हणाले की, पर्यावरणाचा ढासळत असलेला समतोल तसेच ऑक्सिजन अभावी कोरोनाकाळात रुग्णांची झालेली ससेहोलपट या पार्श्वभूमीवर व्यापक प्रमाणावर ऑक्सिजन देणाऱ्या वृक्षांचे रोपण व संवर्धन करणे आवश्यक आहे. छोटासा प्रयत्न म्हणून आम्ही हा उपक्रम राबविला आहे.  गावोगावी आपण आपल्या सुख दुःखाच्या प्रसंगी आपल्या आप्तजांच्या स्मरणार्थ असा उपक्रम राबवीन्याचे त्यांनी आवाहन केले.
          यावेळी द्रोपदी जाधव, निराबाई झिंजाडे, सिंधुबाई जाधव, केशरबाई जाधव, शोभा जाधव, शरद शिंदे, मोहन शिंदे, अनिल झिंजाडे, हनुमंत शिंदे, रघुवीर जाधव, रविंद्र जाधव, भरत जाधव, बंडू शिंदे, सुभाष शिंदे, अशोक शिंदे, अरून झिंजाडे, शहाजी शिंदे, सुधीर झिंजाडे, शांतीलाल झिंजाडे, अशोक झिंजाडे, संपत ठोंबरे, संतोष ठोंबरे नितीन ठोंबरे, दत्ता महाराज नंदरगे, धनंजय झिंजाङे, हरीभाऊ हिरङे.,गणेश ढवळे, कांतीलाल झिंजाङे,राहुल हिरङे, योगेश रंधवे,रामकृष्ण रंधवे, नितीन रंधवे,अकुंश रंधवे, महादेव झिंजाङे, शहाजी झिंजाङे, स्वप्निल झिंजाङे, संतोष झिंजाङे, बापुराव झिंजाङे, देवराव झिंजाङे, मधु झिंजाङे, पाराजी शिंदे, संजय रंधवे, ठोंबरे, राहूल खराडे, मारूती भांड उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा