Breaking

शनिवार, ५ जून, २०२१

सोलापूर जिल्ह्यासाठी कोरोना प्रतिबंधक लस लोकसंख्येच्या प्रमाणात उपलब्ध करून द्यावी.राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे आ. बबनराव शिंदे यांनी केली मागणी.


सोलापूर जिल्ह्यासाठी कोरोना प्रतिबंधक लस लोकसंख्येच्या प्रमाणात उपलब्ध करून द्यावी.
राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे आ. बबनराव शिंदे यांनी केली मागणी.

 

सध्या देशामध्ये व राज्यामध्ये कोरोना या विषाणूची दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आला असून कोरोनाची संभाव्य तिसरी लाटेच्या प्रार्श्वभुमी  विचारात घेऊन  सोलापूर जिल्ह्यासाठी कोरोना प्रतिबंधक लस लोकसंख्येच्या प्रमाणात उपलब्ध करून देण्याची मागणी राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली  असल्याची माहिती आ.बबनराव शिंदे यांनी दिली.

     सध्या सोलापूर जिल्हा रेड झोनमध्ये असून मागील काही दिवसात लसीचा तुटवडा असल्यामुळे सोलापूर जिल्ह्याला लस कमी   प्रमाणात मिळालेली आहे. कोरोनाच्या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण करणे हा पर्याय समोर येत असून लसीकरण झालेल्या रुग्णांमध्ये कोरोना आजार होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या व रुग्णांच्या प्रमाणात लसीची मात्रा कमी पडत असल्याने  सोलापूर जिल्ह्यात लसीकरण कमी  झाले आहे. पुणे महसुली विभागात लोकसंख्येनुसार दुसऱ्या क्रमांकावर (43 लक्ष) असणाऱ्या सोलापूर जिल्ह्यास पुणे, कोल्हापूर,सांगली सातारा या जिल्ह्याच्या तुलनेत लसींचा पुरवठा कमी झाल्याची वस्तुस्थिती माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे व आमदार संजयमामा शिंदे यांनी मागील आठवड्यात राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांच्या निदर्शनास आणून दिली होती.


 आमदार शिंदे म्हणाले की,पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध करण्यासाठी  सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी पुणे विभागाच्या आरोग्य उपसंचालक अर्चना पाटील  यांना सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे  लसीचा पुरवठा  सुरळीत होण्यास काही प्रमाणात मदत होईल असे यावेळी बोलताना सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा