Breaking

रविवार, २७ जून, २०२१

रावसाहेब नाना देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर्स , आशा वर्कर्स , कर्मचारी यांचा सन्मान



रावसाहेब नाना देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर्स , आशा वर्कर्स , कर्मचारी यांचा सन्मान

 टेंभुर्णी(प्रतिनिधी)         येथील  डॉक्टर्स, आशा वर्कर्स, कर्मचारी हे कोरोणाच्या काळामध्ये रात्रंदिवस कष्ट घेत होते त्यांचे काम खरोखरच उल्लेखनीय आहे आणि त्यांचा सन्मान रावसाहेब देशमुख मित्र मंडळ व एकत्व बचत गटाच्या वतीने ठेवण्यात आलेला आहे ही उल्लेखनीय बाब आसल्याचे  प्रतिपादन सरपंच प्रमोद कुटे यांनी केले
जीवघेण्या कोरोना काळात रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा मानून उल्लेखनीय काम केलेल्या वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांचा   सन्मान रावसाहेब देशमुख मित्र मंडळ व एकत्व बचत गटाच्या वतीने टेंभुर्णी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये घेण्यात आला यावेळी अध्यक्षस्थानावरून सरपंच प्रमोद कुटे बोलत होते  यावेळी_माढा तालुका शिवसेनाप्रमुख मधुकर देशमुख, डॉक्टर राहुल पाटील ,डॉक्टर अमोल माने, अश्विनी हॉस्पिटल चे डॉक्टर अशोक मामा पाडूळे ,डॉक्टर मदन कांबळे ,डॉक्टर खताळ ,हर्षवर्धन_ देशमुख, RPI  चे जयवंत पोळ ,अमोल धोत्रे , जनहिताचे विठ्ठल मस्के ,एकत्व महिला बचत गटाच्या अध्यक्षा विद्या मोहोळ, सचिव अनुराधा देशमुख, शिवसेना शहर प्रमुख सुरेश लोंढे ,मयूर काळे ,डॉक्टर सोमनाथ साळुंखे, सोमनाथ कदम, टेंभुर्णी शहर युवक सेनेचे कुलदीप पाटील आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी पुढे बोलताना सरपंच प्रमोद कुटे म्हणाले कोरोना काळामध्ये सर्वच डॉक्टरांनी जीवाचा हि विचार न करता अत्यंत कष्ट घेऊन कोरोना रुग्णाला वाचवण्याचे काम रात्रंदिवस केले आहे त्याचप्रमाणे आशा वर्कर्स यांनी अत्यंत कमी मानधना मध्ये काम केले आहे त्यांचा सन्मान करणे अत्यंत महत्वाची बाबा असल्याचेही ते म्हणाले यावेळी शाल श्रीफळ वृक्ष देेेऊन सर्वांचा सन्मान करण्यात आला या प्रसंगी काँग्रेस आईचे टेंभुर्णी शहर अध्यक्ष सोमनाथ कदम ,गणेश केचे, विद्या ओहोळ आदींनी विचार व्यक्त केले कार्यक्रमाचे आभार अनुराधा देशमुख यांनी मानले हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी गोरख देशमुख, प्रशांत देशमुख ,रणजीत आटकळेे, आप्पा हवलदार ,शैलेश ओहोळ आदींनी परिश्रम घेतले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा