Breaking

मंगळवार, १ जून, २०२१

शेटफळ येथे उजनीच्या पाण्यासाठी लढलेल्या यशस्वी आंदोलनकर्त्यांचा सत्कार**



*शेटफळ येथे उजनीच्या पाण्यासाठी लढलेल्या यशस्वी आंदोलनकर्त्यांचा सत्कार*

*करमाळा तालुका प्रतिनिधी- अतुल वारे पाटील*
    उजनीचे 5 टीएमसी पाणी रोखण्यासाठी जीवाचे रान करून यशस्वी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांचा शेटफळ ता करमाळा येथे उत्स्फूर्तपणे नागरी सत्कार करण्यात आला.
     याबाबत अधिक माहिती देताना संभाजी ब्रिगेड जिल्हा उपाध्यक्ष शंकर पोळ व करमाळा तालुकाध्यक्ष अमित घोगरे म्हणाले की,सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री  दत्तात्रय भरणे मामा यांनी इंदापूर तालुक्याच्या 22 गावांसाठी पाच टीएमसी पाणी मनमानी कारभार करून मंजूर केले होते उजनी जलाशयाच्या शंभर टक्के पाण्याचे वाटप झालेले असताना सांड पाण्याच्या नावाखाली महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री  अजित पवार  यांनी मंजूर केले होते .सांडपाण्याच्या नावाखाली केलेलं वरील मंजूर पाणी हे पाणी उजनी जलाशयातून सांडपाणी येत नसताना सुद्धा ते कशाच्या आधारावर मंजूर केले हेही कोणालाही काहीच माहिती नव्हते. व सोलापूर जिल्ह्याच्या खासदार किंवा विद्यमान आमदार कोणत्याही प्रतिनिधीला विश्वासात घेण्यात आले नाही सोलापूर जिल्ह्यातल्या सर्व शेतकरी संघटनेच्या माध्यमातून लढा देऊन निर्णय रद्द करण्यास भाग पाडले या यशस्वी आंदोलनाबद्दल. संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप,विठ्ठल आबा मस्के,संभाजी ब्रिगेड माळशिरस तालुका उपाध्यक्ष सचिन पराडे पाटील यांचा शेटफळ ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी विकास गुंड-सरपंच शेटफळ,संभाजी ब्रिगेड जिल्हा उपाध्यक्ष शंकर पोळ,करमाळा तालुकाध्यक्ष अमित घोगरे,भाजपाचे चंद्रकांत राखुंडे,सुधीर पोळ, साहेबराव पोळ,संदिप मोरे,माउली पाटील,नाना पोळ, लहु पोळ,गंगाधर पोळ,राजेंद्र पोळ,धनंजय गायकवाड, उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा